Kerala Woman Wins Lottery : अबू धाबीमध्ये राहणाऱ्या एका भारतीय प्रवासी महिलेने खूप मोठी लॉटरी जिंकली आहे. केरळच्या महिलेने अबू धाबीमध्ये 44.75 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. लीना जलाल (Leena Jalal) असे या महिलेचे नाव आहे. भारतीय प्रवासी लीना जलाल यांनी बिग तिकीट लॉटरीमध्ये 44.75 कोटी रुपये जिंकले. केरळची राहणारी लीना जलाल ही महिला ह्यूमन रिसोर्स अधिकार म्हणून अबू धाबीमध्ये काम करते. 
महिलेने सांगितले की जिंकलेली रक्कम ती इतर 10 लोकांसोबत वाटून घेणार आहे. शिवाय यामधील एक भाग दानही करणार आहे.


केरळच्या महिलेने अबू धाबीमध्ये जिंकले 44 कोटी
मीडिया रिपोर्टनुसार, अबू धाबी रहणाऱ्या भारतीय प्रवासी महिलेना 'बिग तिकिट अबू धाबी विकली ड्रॉमध्ये 44.75 कोटी रुपयांची मोठी रक्कम जिंकली आहे. 3 फेब्रुवारीला झालेल्या लकी ड्रॉमध्ये लीना जलाल या महिलेच्या 'टॅरिफ 22 नेटवर्क सिरीज 236' च्या 144387 या तिकीट क्रमांकांची निवड झाली.


केरळमधील आणखी एक व्यक्ती रातोरात करोडपती
मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे की, त्यावेळी लॉटरी जिंकणारी ती एकमेव भाग्यवान भारतीय प्रवासी नव्हती. केरळमधील दुसर्‍या प्रवासी सुरीफ सुरु या व्यक्तीलाही लॉटरी लागली आहे. सुरीफ सुरुने 236 सीरिजमधील तिकिटावर मोठी रक्कम जिंकली आहे. ही व्यक्ती केरळच्या मल्लापुरम जिल्ह्यातील रहिवासी आहे. सुरीफ सुरु जिंकलेली रक्कम 29 लोकांसोबत वाटून घेणार असून यातील काही भाग गोरगरिबांच्या मदतीसाठी देणार आहे. मागच्या वर्षीही दुबईमध्ये ड्रायव्हरची नोकरी करणाऱ्या केरळमधील एकमेव व्यक्तीला 40 कोटी रुपयांचा लकी ड्रॉ जिंकला होता.


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha