Jio New Recharge Plan : तुम्ही रिलायन्स (Reliance) जिओचे (Jio) ग्राहक असाल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा. ही बातमी तुमच्या बजेटशी संबंधित आहे. जिओने ग्राहकांना पुन्हा एकदा झटका दिला आहे. जिओने आपल्या तीन प्रीपेड रिचार्ज प्लॅनच्या (Recharge Plan) किमती वाढवल्या आहेत. या तिन्हींचा कंपनीच्या लोकप्रिय प्लॅनमध्ये समावेश करण्यात आला आहे. या वाढीचा परिणाम तुमच्या खिशावरही होईल. कोणत्या प्लॅनमध्ये किती बदल झाले ते जाणून घेऊया.


155 रुपयांचा प्लॅन आता 186 मध्ये
कंपनीने 155 रुपयांच्या प्लॅनमध्ये 31 रुपयांची वाढ केली आहे. आता हा प्रीपेड रिचार्ज प्लॅन 186 रुपयांचा झाला आहे. हा प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये यूजर्सना दररोज 1 जीबी डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS पर्याय मिळतात. याशिवाय जिओचे सर्व अ‍ॅप्स मोफत उपलब्ध आहेत.


आता 186 रुपयांच्या प्लॅनसाठी 222 रुपये मोजावे लागणार
जिओने आपल्या 186 रुपयांच्या प्लॅनमध्येही बदल केले आहेत. 36 रुपयांच्या वाढीनंतर आता ग्राहकाला यासाठी 222 रुपये मोजावे लागणार आहेत. हा प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये दररोज 2 जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये जिओच्या सर्व अ‍ॅप्सचा वापर मोफत आहे.


749 रुपयांचा प्लॅन झाला 899 रुपयांचा
28 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनची​किंमत पूर्वी 749 रुपये होती, परंतु आता त्याची किंमत 899 रुपये झाली आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा मिळतो. याशिवाय तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देखील मिळत आहे. तुम्ही दररोज 50 एसएमएस देखील पाठवू शकता. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्ही जिओचे सर्व अ‍ॅप्स मोफत वापरू शकता.


152 रुपयांचा नवीन प्लॅन
तीन प्लॅनमध्ये वाढ करण्यासोबतच, जिओने ग्राहकांसाठी एक नवीन प्लान (Jio New Recharge Plan) देखील लाँच केला आहे. 152 रुपयांच्या या नवीन प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 500 एमबी डेटा मिळेल. याशिवाय प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 300 एसएमएसची सुविधाही देण्यात आली आहे. त्याची वैधता 28 दिवसांची असेल आणि तुम्ही जिओचे सर्व अ‍ॅप्स देखील वापरता येतील.


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha