Coronavirus : 'फ्रंटियर्स इन मेडिसिन’ (Frontiers in Medicine) या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की, SARS-CoV 2 विषाणू ज्यामुळे कोविड-19 होतो, एखाद्या व्यक्तीला 200 दिवसांपेक्षा जास्त काळ संक्रमित करु शकतो. संशोधकांनी एप्रिल ते नोव्हेंबर 2020 दरम्यान SARS-CoV 2 ची लागण झालेल्या 38 ब्राझिलियन रुग्णांचा या अभ्यासात समावेश केला होता.


ट्रॅक केलेल्या 38 प्रकरणांपैकी, दोन पुरुष आणि एक स्त्रीच्या शरीरात कोरोनाचा विषाणू 70 दिवसांपेक्षा जास्त दिवस होता. या अभ्यासाच्या आधारे, संशोधकांचे म्हणणे आहे की, SARS-CoV 2 ची लागण झालेल्या सुमारे 8 टक्के लोकांना संसर्गाच्या शेवटच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे न दाखवता, दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ विषाणूचा संसर्ग होऊ शकतो.


विषाणू अधिक काळ राहतो सक्रिय
संशोधनाचे प्रमुख पाओला मिनोप्रिओ यांनी सांगितले की, रुग्ण निगेटिव्ह येण्यास एक महिना लागू शकतो. अभ्यासातील काही प्रकरणांमध्ये, रुग्ण 71 ते 232 दिवसांपर्यंत पॉझिटिव्ह आले आहेत. तर, कमी लक्षणे असलेल्या रुग्णांमध्येही विषाणू अपेक्षेपेक्षा जास्त काळ सक्रिय राहू शकतो. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे अशा लोकांमध्ये ही स्थिती अधिक धोकादायक बनू शकते. तसेच जर त्यांना कोणत्याही आरोग्य स्थितीचा सामना करावा लागत असेल.


143 दिवसांपर्यंत परत येतो विषाणू
डिसेंबर 2020 च्या सुरुवातीस, 'न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन'मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात इम्युनोकॉम्प्रोमाइज्ड 45 वर्षीय पुरुषाला Autoimmune Blood Disorder असलेल्या प्रकरणात कोरोनाचा विषाणू 143 दिवसापर्यंत रुग्णाच्या शरीरात परत येत राहिला.


कोविड-19 ची लक्षणे नसलेल्या रुग्णालाही धोका
डिसेंबरच्या उत्तरार्धात सेलमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात, ल्युकेमिया (Leukaemia) असलेल्या एका महिलेच्या केस स्टडीमध्ये असे आढळून आले की, कोविड-19 ची कोणतीही लक्षणे नसतानाही हा विषाणू कमीतकमी 70 दिवस परत येत राहतो.


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha