लंडन :  एका लहानशा पालीने तब्बल चार हजार मैलांचा प्रवास केल्याचं कुणाला सांगितलं तर ते पटणारं आहे का? पण अशी विचित्र घटना घडलीय. इंग्लंडमधील एका महिलेच्या ब्रा मधून लपून एका लहानशा पालीने बार्बादोस ते यॉर्कशायर असा तब्बल चार हजार मैलांचा प्रवास केला आहे. ( Gecko Survives 4000 Mile Journey Hidden in Womans Bra England). लिसा रसेल (47 वर्षे) असं या महिलेचं नाव असून तिला रॉथरहॅम मधील घरी आल्यानंतर आपल्या बॅगेत ठेवलेल्या ब्रा मधून पाल आल्याची माहिती झाली. लिसा रसेलने या लहान पालीचे नाव 'बार्बी' असं ठेवलं आहे. 


लिसा रसेल जेव्हा सुट्ट्या संपवून आपल्या घरी आली तेव्हा तिने आपली बॅग उघडली. या बॅगमध्ये तिचे सर्व कपडे होते. ते पाहताना तिला एकदम आश्चर्याचा धक्का बसला. तिच्या बॅगेत ठेवलेल्या ब्रा मध्ये एक लहानशी पाल होती. बीबीसी या वृत्त समूहाशी बोलताना रसेलने सांगितलं की, "माझ्या कपड्यांमध्ये पाल सापडल्याने मला एकदम धक्काच बसला. त्या पालीने हालचाल केली असती मी घाबरले आणि ओरडायला सुरुवात केली. तुम्ही जवळेपास चार हजार किलोमीटरचा प्रवास करुन आल्यानंतर तुमच्या कपड्यांमध्ये पाल असणं तुम्हाला कसं काय अपेक्षित असू शकेल?"


रसेलने सांगितलं की, ज्या ब्रामध्ये ती पाल लपली होती तो ब्रा मी बॅगच्या सर्वात वरती ठेवला होता. त्यामुळे ती पाल वाचली. ते जर कपड्यांच्या मध्ये असते तर ती पाल नक्कीच गुदमरून मेली असती. 


रसेलने या लहान पालीचा फोटोदेखील काढलाय. कारच्या चावीच्या बाजूला ठेवून काढलेल्या या फोटोवरून ती पाल जास्तीत जास्त एक सेंटीमीटर लांबीची असेल असं दिसतंय. 


संबंधित बातम्या :