Vatican Confirms Pope Francis Dies at 88 : कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे प्रदीर्घ आजाराने निधन; गेल्या 1 हजार वर्षांमध्ये पहिले गैर युरोपियन पोप होण्याचा बहुमान
Vatican Confirms Pope Francis Dies at 88 : पोप फ्रान्सिस हे इतिहासातील पहिले लॅटिन अमेरिकन पोप होते. पोप यांचे शेवटचे सार्वजनिक दर्शन ईस्टरच्या शुभेच्छा देताना झाले.

Vatican Confirms Pope Francis Dies at 88 : कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस (Pope Francis death) यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले. व्हॅटिकनने दिलेल्या माहितीनुसार (Vatican Confirms Pope Francis Dies at 88 After Health Complications) पोप यांनी आज (21 एप्रिल) स्थानिक वेळेनुसार सकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी वाजता अखेरचा श्वास घेतला. पोप फ्रान्सिस हे इतिहासातील पहिले लॅटिन अमेरिकन पोप होते. पोप यांचे शेवटचे सार्वजनिक दर्शन ईस्टरच्या शुभेच्छा देताना झाले. पंतप्रधान मोदींनी यांनी पोप यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, "पोप फ्रान्सिस यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. या दुःखाच्या वेळी जगातील कॅथोलिक समुदायाप्रती माझी मनापासून संवेदना."
गेल्या काही महिन्यांपासून ते आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त होते. 14 फेब्रुवारी रोजी त्यांना रोमच्या जेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर न्यूमोनिया आणि अशक्तपणाचा उपचार सुरू होता. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांना पाच आठवडे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान, कॅथोलिक चर्चचे मुख्यालय असलेल्या व्हॅटिकनने म्हटले होते की पोप यांच्या रक्त तपासणी अहवालात मूत्रपिंड निकामी होण्याची लक्षणे दिसून आली. तथापि, त्यांना 14 मार्च रोजी डिस्चार्ज देण्यात आला.
1 हजार वर्षात पोप होणारे पहिले बिगर-युरोपियन
पोप फ्रान्सिस हे 1 हजार वर्षांत पोप म्हणून निवडले जाणारे पहिले बिगर-युरोपियन होते. पोप फ्रान्सिस यांनी समलैंगिकांना चर्चमध्ये येण्याची परवानगी देणे, समलैंगिक जोडप्यांना आशीर्वाद देणे आणि पुनर्विवाहाला धार्मिक मान्यता देणे असे मोठे निर्णय घेतले. चर्चमध्ये मुलांवरील लैंगिक शोषणाबद्दल त्यांनी माफीही मागितली. पोप फ्रान्सिस हे अर्जेंटिनाचे जेसुइट धर्मगुरू होते जे 2013 मध्ये रोमन कॅथोलिक चर्चचे 266 वे पोप बनले. त्यांना पोप बेनेडिक्ट सोळावे यांचे उत्तराधिकारी म्हणून निवडण्यात आले. पोप फ्रान्सिस हे गेल्या 1 हजार वर्षात पहिले व्यक्ती होते जे युरोपियन नव्हते परंतु कॅथोलिक धर्मात सर्वोच्च पदावर पोहोचले.
श्री श्री रविशंकर यांच्याकडून श्रद्धांजली
श्री श्री रविशंकर यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, पोप फ्रान्सिस हे एक खोलवर विश्वास ठेवणारे आणि परंपरावादी होते! ते सुधारणांचे समर्थक होते आणि आंतरधर्मीय संवादाचे उत्कट पुरस्कर्ते होते. पर्यावरणाबद्दलची त्यांची चिंता आणि मानवी तस्करीविरुद्धचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत. अधिक समजुतीचे त्यांचे आवाहन त्यांच्या अनुयायांना प्रेरणा देत राहील. दिल्ली आणि वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या जागतिक संस्कृती महोत्सवात त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगसाठी एक संदेश देऊन त्यांचे दूत पाठवले होते.
अर्जेंटिनामधील फ्लोरेन्समध्ये जन्म
पोपचा जन्म 17 डिसेंबर 1936 रोजी अर्जेंटिनामधील फ्लोरेन्स येथे झाला. पोप होण्यापूर्वी ते जॉर्ज मारियो बर्गोग्लिओ या नावाने ओळखले जात होते. पोप फ्रान्सिस यांचे आजी-आजोबा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनीपासून वाचण्यासाठी इटली सोडून अर्जेंटिनाला गेले. पोप यांनी त्यांचे बहुतेक आयुष्य अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयर्समध्ये घालवले. ते सोसायटी ऑफ जीझस (जेसुइट्स) चा सदस्य असलेले पहिला पोप होते आणि अमेरिकेतून आलेले पहिले पोप होते. त्यांनी ब्युनोस आयर्स विद्यापीठातून तत्वज्ञान आणि धर्मशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. 1998 मध्ये ते ब्यूनस आयर्सचे आर्चबिशप बनले. 2001 मध्ये, पोप जॉन पॉल दुसरे यांनी त्यांना कार्डिनल बनवले.
पोप फ्रान्सिस यांचे मोठे निर्णय
समलैंगिक व्यक्तींच्या चर्चमध्ये प्रवेशाबद्दल
पोप पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या चार महिन्यांनी समलैंगिकतेच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यावर ते म्हणाले की, 'जर समलिंगी व्यक्ती देवाचा शोध घेत असेल, तर मी त्यांना न्याय देणारा कोण?'
पुनर्विवाहाला धार्मिक मान्यता
पोप यांनी पुनर्विवाह करणाऱ्या घटस्फोटित कॅथोलिकांना धार्मिक मान्यता दिली. त्यांनी अशा लोकांना सहभोजनाचा अधिकार दिला, ज्यामुळे सामाजिक बहिष्कार संपला. सहभोजन ही एक प्रथा आहे ज्यामध्ये येशूच्या शेवटच्या रात्रीच्या जेवणाची आठवण म्हणून ब्रेड/पवित्र ब्रेड आणि वाइन/द्राक्षाचा रस सेवन केला जातो. याला प्रभूभोजन किंवा युकेरिस्ट असेही म्हणतात.
बाल लैंगिक शोषणाबद्दल माफी मागितली
पोप फ्रान्सिस यांनी एप्रिल 2014 मध्ये पहिल्यांदाच चर्चमध्ये मुलांवरील लैंगिक शोषणाची कबुली दिली आणि सार्वजनिकरित्या माफीही मागितली. त्यांनी चर्चच्या पुजारींनी केलेल्या या गुन्ह्याला नैतिक मूल्यांचा ऱ्हास म्हटले. आतापर्यंत कोणत्याही पोपकडून या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया न मिळाल्याबद्दल व्हॅटिकनवर टीका होत होती. गेल्यावर्षी 27 सप्टेंबर रोजी बेल्जियमच्या भेटीदरम्यान त्यांनी कॅथोलिक चर्चना बाल लैंगिक शोषणाबद्दल माफी मागण्यास सांगितले. त्यांनी ब्रुसेल्समधील पाद्रींकडून लैंगिक शोषण झालेल्या 15 पीडितांनाही भेटले.
इतर महत्वाच्या बातम्या























