World Bank Head : मास्टरकार्डचे माजी सीईओ आणि भारतीय वंशाचे अजय बंगा वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अजय बंगा यांच्या नावाचा प्रस्ताव दिला आहे. व्हाइट हाऊसने गुरुवारी याबाबतची माहिती दिली आहे. 63 वर्षीय बांगा हे इंडो अमेरिकन आहे. सध्या David Malpass हे जागतिक बॅंकेच्या अध्यक्षपदी आहेत. पण लवकरच ते पायउतार होणार आहेत. जो बाइडन म्हणाले की, अजय बंगा यांनी तीन दशकांहून अधिक काळ जागतिक कंपन्यांच्या व्यवस्थापनात काम केले आहे. रोजगार निर्माण करणाऱ्या आणि विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या जगभरातील नेत्यांसोबत काम केले आहे. त्यासोबत भागीदारी करण्याचा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे.
कोण आहेत अजय बंगा?
63 वर्षीय अजय बंगा भारतीय वंशाचे अमेरिकन आहेत. सध्या ते इक्विटी फर्म जनरल अटलांटिकमध्ये उप अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाचा प्रस्ताव दिला आहे.
अजय बंगा नेदरलँड येथील गुंतवणूक करणारी होल्डिंग कंपनी एक्सोरचे अध्यक्षही आहेत. बंगा यूएस-इंडिया बिजनेस काऊंसिल (USIBC) चे माजी अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलेय. ही कंपनी भारतात गुंतवणूक करणाऱ्या सर्वात मोठ्या कंपनीपैकी एक आहे.
अजय बंगा यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1959 रोजी पुण्यातील खडकी छावनी येथे एका शिख कुटुंबात झाला होता. त्यांचं कुटुंब मूळचे पंजाबमदील जालंधर येथील राहणारे आहे. त्यांचे वडील हरभजन सिंह बंगा एक निवृत्त लेफ्टिनेंट जनरल आहेत. त्यांना 2016 मध्ये केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेय.
आणखी वाचा :
Rohit vs Virat : विराटकडे बघ जरा.... 'वजनदार' रोहितला कपिल देव यांचा सल्ला