India vs Australia, WT20 Semi-Final : बेथ मूनीचं दमदार अर्धशतक आणि कर्णधार मेग लॅनिंग हिची विस्फोटक खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने निर्धारित 20 षटकात चार विकेट्सच्या मोबदल्यात 172 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताला विजयासाठी ऑस्ट्रेलियाने 173 धावांचे आव्हान दिलेय. निर्णायाक सामन्यात भारताच्या एकाही गोलंदाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही, त्याशिवाय फिल्डर्सनेही नांगी टाकली.  फायनलमध्ये पोहचण्यासाठी भाराताला निर्धारित 20 षटकात 173 धावांचे आव्हान आहे. 


एलिसा हिली आणि बेथ मूनी या दोघींनी ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करुन दिली. दोघींनी अवघ्या 45 चेंडूत अर्धशतकी भागिदारी केली. त्यानंतर बेथ मूनी हिने कर्णधाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढवली. बेथ मूनी आणि मेग लॅनिंग यांनी दुसऱ्या विकेटसाठी 27 चेंडूत 36 धावांची भागिदारी केली. बेथ मूनी हिने अर्थशतक झळकावले, त्यानंतर ती बाद झाली. पण त्यानंतर मेग लॅनिंग आणि एशलेग गार्डनर यांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. दोघींनीही चौकार आणि षटकार लगावत धावांचा पाऊस पाडला. दोघांनी प्रत्येक षटकात एक तरी चौकार लगावत भारतीय गोलंदाजांची पिटाई केली. दोघींनी अवघ्या 32 चेंडूत अर्थशतकी भागिदारी केली.  फक्त 18 चेंडूत 31 धावा करुन एशलेग गार्डनर बाद झाली. दिप्ती शर्माने एशलेगला बाद केले. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग हिने धावांचा पाऊस पाडला. मेग लॅनिंग हिने निर्णायाक खेळी केली. 


भारताची खराब गोलंदाजी -


उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी खराब कामगिरी केली. स्नेह राणा, राधा यादव, शिखा पांडे, रेनुका सिंह आणि दिप्ती शर्मा एकाही गोलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. एकाही गोलंदाला धावा रोखण्यात यश आले नाही. शिखा पांडेनं सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर राधझा यादव आणि दिप्ती शर्मा यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. रेणुका सिंह सर्वात महागाडी गोलंदाज ठरली. रेणुकाने चार षटकात दहा पेक्षा जास्त सरासरीने धावा लुटल्या. 


भारताचे खराब क्षेत्ररक्षण  - 


एका बाजूने ऑस्ट्रेलियाचे फलंदाज धावांचा पाऊस पाडत होते, दुसऱ्या बाजूला भारतीय फिल्डर्सनी खराब फिल्डिंग केली. ऋचा घोष आणि शेफाली वर्मा यांनी झेल सोडले. याचा फटका टीम इंडियाला बसला. ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग हिला सुरुवातीलाच जिवनदान दिले. त्याशिवाय बेथ मूनीचाही झेल सोडला. या दोन्ही फलंदाजांनी नंतर धावांचा पाऊस पडला. झेल सोडलेच त्याशिवाय काही फिल्डर्सने एकेरी दुहेरी धावसंख्याही दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ मोठी धावसंख्या उभारु शकला. 


नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने - 


महिला टी20 वर्ल्ड कपमधील निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंग हिने नाणेफेकीचा कौल जिंकला. नाणेफेक जिंकून मेग लेनिंग हिने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारातीय संघाला गोलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले. 


भारतीय संघात दोन बदल -
भारतीय टीम उपांत्य सामन्यात दोन बदलासह मैदानात उतरला. पूजा वस्त्राकरच्या जागी स्नेह राणाला स्थान दिलेय तर राजेश्वरी गायकवाडच्या जागी राधा यादवला प्लेईंग 11 मध्ये संधी दिली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्लेइंग इलेव्हन कशी आहे


भारत महिला (प्लेइंग इलेव्हन ): शेफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमा रोड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, स्नेह राणा, शिखा पांडे, राधा यादव, रेणुका ठाकुर सिंह 


ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेवन) : एलिसा हिली (विकेटकीपर), बेथ मूनी, मेग लॅनिंग (कर्णधार), एशलेग गार्डनर, एलिसे पेरी, ताहलिया मॅकग्राथ, ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वेयरहम, जेस जोनासेन, मेगन शुट्ट, डार्सी ब्राउन