Rohit vs Virat : चेतन शर्मा (Chetan Sharma) यांच्या स्टिंग ऑपरेशनचं प्रकरण अजून शांत झालं नाही, तोपर्यंत कपिल देव यांच्या वक्तव्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा (Rohit vs Virat) यांच्या चाहत्यांमध्ये वाद सुरु झाला आहे. एबीपी न्यूजसोबत बोलताना कपिल देव यांनी रोहित शर्माच्या फिटनेसवर सवाल उपस्थित केला आहे. त्याशिवाय फिटनेससाटी विराट कोहलीचं उदाहरण दिलेय. रोहित शर्मानं (Rohit Sharma)आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करावं, असेही कपिल देव म्हणाले. कपिल देव यांच्या वक्तव्यानंतर विराट-रोहितचे चाहते सोशल मीडियावर भिडले आहेत. दरम्यान, याआधीच टीम इंडियाचे माजी फिल्डिंग कोच यांनी आपल्या पुस्तकात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील गटबाजीवर आपलं मत मांडलेय. त्यातच कपिल देव यांच्या वक्तव्यानंतर दोन्ही खेळाडूचे चाहते भिडले आहेत. रोहित शर्माच्या चाहत्यांना कपिल देव यांचं हे वक्तव्य पटलेलं नाही, सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.
मायदेशात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरोधात चार सामन्याची कसोटी मालिका खेळत आहे. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत पहिल्या दोन्ही सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरोधात शतकी खेळी केली होती. रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियावर 2-0 ने आघाडी घेतली आहे. त्यानंतरही भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या कर्णधाराने रोहित शर्माच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केला आहे. कपिल देव यांनी रोहित शर्माच्या फिटनेसवर चिंता व्यक्त केली आहे. कपिल देव यांनी रोहित शर्माला आपल्या फिटनेसवर काम करण्याचा सल्ला दिला आहे. रोहित शर्माने विराट कोहलीसारखी आपली फिटनेस करावी, असेही कपिल देव यांनी म्हटले आहे.
जर तुम्ही फिट नाहीत तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे
एबीपी न्यूजसोबत बोलताना कपिल देव म्हणाले की, ‘ खेळाडू म्हणून फिट राहणे महत्वाचं आहे. जर तुम्ही फिट नसाल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. रोहित शर्माने आपल्या फिटनेसवर काम करायला हवं. रोहित शर्मा सर्वोत्तम खेळाडू आहे, यात शंकाच नाही. पण जर फिटनेसकडे पाहिल्यानंतर तो थोडा जाड दिसतो, कमीतकमी टिव्हीवर तरी... हो... जेव्हा तुम्ही कुणाला टिव्हीवर कुणाला पाहत असाल तर रिअल लाईफपेक्षा वेगळे दिसू शकता. पण तुम्हाला फिट राहणे गरजेचं आहे. तुम्ही विराटकडे पाहा.. त्याला पाहून खेळाडू असा फिट असावा असे म्हणता...’
रोहितच्या फिटनेसवर याआधी प्रश्न -
कपिल देव यांनी याआधीही रोहित शर्माच्या फिटनेसवर सवाल उपस्थित केला होता. याआधाही कपिल देव यांनी रोहित शर्माला फिटनेसवर काम करण्याचा सल्ला दिला होता. कपिल देव म्हणाले होते की, पूर्णपमे फिट आहेस? संघातील खेळाडूला आपल्या कर्णधारावर गर्व असायला हवा. रोहित शर्माला आपल्या फिटनेसवर काम करण्याची गरज आहे. त्याच्या क्रिकेट स्किल्सवर मला आक्षेप नाही, तो महान क्रिकेटर आहे. दरम्यान, आशिया चषकात भारताच्या पराभवानंतर अनेक क्रीडा तज्ज्ञांनी रोहित शर्माच्या फिटनेसवर सवाल उपस्थित केला होता.