एक्स्प्लोर
म्हणून आजतागायत दारुच्या थेंबालाही स्पर्श केला नाही : ट्रम्प
व्हाईट हाऊसमध्ये एका भाषणादरम्यान ट्रम्प यांनी भावाची आठवण सांगितली. आपण आपल्या भावाला हळूहळू दारुच्या गर्तेत जाताना पाहिल्याचं ते म्हणाले.
न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण दारुच्या थेंबालाही हात लावत नसल्याचं सांगितलं आहे. अकाली मृत्यू आलेल्या आपल्या मोठ्या भावाचा किस्सा सांगता-सांगता ट्रम्प भावुक झाले.
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा भाऊ फ्रेड ट्रम्प यांचा 1981 मध्ये मृत्यू झाला होता. दारुच्या आहारी गेल्यामुळे वयाच्या अवघ्या 46 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
व्हाईट हाऊसमध्ये एका भाषणादरम्यान ट्रम्प यांनी भावाची आठवण सांगितली. आपण आपल्या भावाला हळूहळू दारुच्या गर्तेत जाताना पाहिल्याचं ते म्हणाले. भावाच्या अनुभवातूनच मी शिकत गेल्याचं ट्रम्प म्हणाले.
'मला एक भाऊ होता. फ्रेड. उत्तम मुलगा. देखणा मुलगा. लोभस व्यक्तिमत्त्व. माझ्यापेक्षा खूपच चांगला. पण त्याची एक समस्या होती. तो मद्याच्या आहारी गेला होता. तो मला सांगायचा, मद्यपान करु नकोस. तो माझ्यापेक्षा मोठा असल्यामुळे मी त्याचा आदर करायचो. त्याचं म्हणणं ऐकायचो. तो सतत मला सांगायचा. पिऊ नकोस. धूम्रपानही करु नकोस' असं ट्रम्प म्हणाले.
'आजतागायत मी कधीच अल्कोहोल घेतलेली नाही. मला इच्छाही नाही. मी कधी सिगरेटही हातात धरली नाही. सुदैवाने मला मार्गदर्शक होता. माझं ऐका, मद्यपानामुळे त्याचं आयुष्य खूप म्हणजे खूप यातनादायी गेलं.' असं ट्रम्प म्हणाले. 'तो खूप खंबीर होता, पण तो ज्या परिस्थितीतून गेला, ती कठीण होती. मी फ्रेडकडून खूप काही शिकलो' असं सांगताना ट्रम्प यांना भावना अनावर झाल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement