एक्स्प्लोर

Iran US War : आमच्या भानगडीत लक्ष द्यायचं नाही; चीनचा अमेरिकेला इशारा,होर्मुझ सामुद्रधुनीवरून तणाव शिगेला

Iran US War Update : होर्मुझ सामुद्रधुनीवर नाकेबंदीची अमेरिकेची धमकी आणि त्यावर चीनची प्रतिक्रिया यामुळे पश्चिम आशियात तणाव वाढला असून जागतिक पातळीवर त्याचे परिणाम होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझ सामुद्रधुनीचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर नियंत्रण ठेवण्याचा इशारा दिल्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली आहे. त्यावर आता चीननेही स्पष्ट भूमिका घेतली असून, 'आमच्या व्यवहारात कोणी हस्तक्षेप करू नये' असा स्पष्ट इशारा दिला आहे.

US Threat on Hormuz : होर्मुझवर अमेरिकेची नाकेबंदीची धमकी

इस्लामाबादमध्ये झालेल्या चर्चेनंतर कोणताही ठोस निर्णय न झाल्याने अमेरिका-इराण तणाव आणखी वाढल्याचं दिसतंय. त्यानंतर ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

China Reaction On Trump Statement : चीनचा अमेरिकेला इशारा

चीनचे संरक्षण मंत्री अॅडमिरल डोंग जुन यांनी स्पष्टपणे सांगितलं की, चीन पश्चिम आशियातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून चीनचे जहाज नियमितपणे ये-जा करत असून, इराणसोबतचे व्यापार आणि ऊर्जा करार कायम ठेवले जातील. यामध्ये कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाला चीन विरोध करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Iran Tension Update : इराणचीही कडक भूमिका

अमेरिकेच्या या भूमिकेनंतर इराणकडूनही तीव्र प्रतिक्रिया आली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार इराणकडे असल्याचं सांगत त्यांनी कोणत्याही दबावाला झुकणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या भागात तणाव आणखी वाढण्याची चिन्हं आहेत.

Global Impact : जागतिक पातळीवर परिणामांची भीती

होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील महत्त्वाची तेल वाहतूक मार्ग असल्यामुळे येथे निर्माण झालेला तणाव जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकतो. तज्ज्ञांच्या मते, जर परिस्थिती आणखी बिघडली तर तेलाच्या किंमती वाढण्याची आणि ऊर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा चर्चा?

अमेरिका आणि इराणमध्ये चर्चा फिस्कटल्यानंतर आता पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे. तसं वृत्त अमेरिकेतल्या वॉल स्ट्रीट जर्नलनं दिलं आहे. अमेरिका आणि इराणमध्ये पहिल्या टप्प्यात 21 तास चर्चा होऊनही तोडगा निघाला नाही. 'सारं जुळत होतं, मात्र अणुकार्यक्रमावरुन अडलं' अशी प्रतिक्रिया इराणने दिली आहे. तर इराण पुन्हा चर्चेला आला तरी अडचण नाही अशी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. 

इराण आणि अमेरिकेसह इतर देशांनीही चर्चेचा पुरस्कार केला आहे. यावेळी रशियाचे ब्लादिमीर पुतीन यांनी इराण आणि अमेरिकेच्या चर्चेमध्ये मध्यस्ती करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
UAE Missile Alert : क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Embed widget