Iran US War Strait of Hormuz: अमेरिकेने पर्शियन गल्फचं नाव बदललं, होर्मुझची सामुद्रधुनीबाबतही मोठा निर्णय; काय काय घडतंय?
Iran US War Strait of Hormuz: इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण सोडायला तयार नाही. त्यामुळे आता इथला तणाव कमालीचा वाढण्याची भीती आहे.

Iran US War Strait of Hormuz: इराण आणि अमेरिकेची (Iran US War) चर्चा फिस्कटल्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अमेरिका होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी करणार आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीकडे अमेरिका पाणसुरूंगरोधी जहाजं पाठवण्याची तयारी करत आहे अशी माहिती समोर येत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीकडे जाणाऱ्या येणाऱ्या जहाजांचं नियंत्रण अमेरिका करेल, असं ट्रम्प यांनी जाहीर केलंय. इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण सोडायला तयार नाही. त्यामुळे आता इथला तणाव कमालीचा वाढण्याची भीती आहे. याचदरम्यान आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे. (Iran US War Strait of Hormuz)
अमेरिकेने पर्शियन गल्फचं नाव बदललं आहे. अमेरिका पर्शियन गल्फला आता अरेबियन गल्फ म्हणून संबोधणार आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने या नव्या नावाची घोषणा केली आहे. यासोबतच 'होर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) हे नाव वापरणेही बंद करण्यात आले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीचंही नाव बदलण्याचा अमेरिकेचा घाट असल्याचं दिसून येत आहे. (Iran US War Strait of Hormuz)
डोनाल्ड ट्रम्पला इराणचं प्रत्युत्तर- (Donald Trump Iran US War)
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर इराणने प्रत्युत्तर दिलंय. बिगर लष्करी जहाजांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली आहे, मात्र लष्करी जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीत प्रवेश करता येणार नाही असं इराणने स्पष्ट केलंय. होर्मुझच्या सामुद्रधुनीचं नियंत्रण इराणी लष्कराकडेच आहे असाही दावा इराणने केलाय. तसंच होर्मुझच्या सामुद्रधुनीत येऊन लष्करी कारवाई करण्याचा प्रकार कोणत्याही देशाने केला तर तो खपवून घेतला जाणार नाही असंही इराणने म्हटलंय. होर्मुझच्या सामुद्रधुनीत नजीकच्या काळात कोणत्याही देशाचं नौदल दिसल्यास ते युद्धविरामाचं उल्लंघन मानलं जाईल, असं ट्रम्प म्हणाले. (Iran US War Strait of Hormuz)
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका आणि इराणची नौदलं आमने सामने- (Iran US War)
होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून इराण आणि अमेरिका यांच्यातला तणाव कमालीचा टोकाला गेला आहे. पाकिस्तानात दोन्ही देशांची शांती वार्ता सुरू असतानाही दोन्ही देशांची नौदलं होर्मुझच्या सामुद्रधुनीत आमने सामने आली होती, असा दावा करण्यात येतोय. हा मुद्दा इराणी शिष्टमंडळाने अमेरिकेसमोर मांडला. त्यावर इराणच्या आत्मघाती नौका अमेरिकेच्या युद्धनौकांवर हल्ला करतील असा संशय आहे. त्यामुळे अमेरिकेनं हे आक्रमक पाऊल उचलल्याचं अमेरिकन शिष्टमंडळाने प्रत्युत्तर दिलं. अमेरिकन युद्धनौकांवर हल्ला झाला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असं इराणच्या शिष्टमंडळाला अमेरिकेने धमकी दिली. त्यावर इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांची घबराट उडाल्याचा दावा करण्यात येतोय. त्यांनी आपल्या लष्कराला अमेरिकन ताफ्यावर हल्ला न करण्याच्या सूचना फोनवरून दिल्या. मात्र या सूचना देताना त्यांचा आवाज टोकाला गेला होता अशी माहिती समजतेय. या सगळ्या प्रकारानंतर अमेरिकन नौदलाच्या दोन युद्धनौकांनी होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली असा दावा करण्यात आला. मात्र इराणने अमेरिकेचा हा दावा फेटाळला.
इराण पुन्हा चर्चेला येतं की नाही याची पर्वा नाही, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ठणकावले, VIDEO:
संबंधित बातमी:






















