US Elections: जगातील सर्वात शक्तिशाली देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या सिंहासनावर कोण बसणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे. आज मतमोजणी तिसरा दिवस आहे तरी अद्याप स्पष्ट निकाल हाती आलेला नाही,  राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि  जो बायडन दोघे आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. बायडन हे विजयाच्या जवळ आहेत, असं असलं तरी चित्र अद्याप स्पष्ट नाही. आता ट्रम्प यांच्या विजयासाठी मंत्र तंत्राचा आधार घेतला जात आहे.


सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल
अमेरिकेतील एक व्हिडीओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ट्रम्प यांच्या विजयासाठी  तंत्र मंत्रांचा आधार घेतला जात असल्याचं दिसत आहे. ट्रम्प पिछाडीवर असल्याचं माहिती झाल्यानंतर त्यांच्या धर्मगुरु पाउला व्हाईट यांनी तात्काळ ट्रम्प यांच्या विजयासाठी प्रार्थना सुरु केली आहे.  पाउला यांनी मंचावरुन दक्षिणी अमेरिका तसंच लॅटिन अमेरिकेत ट्रम्प यांच्या विजयासाठी देवदूतांना आवाहन केलं आहे.





राष्ट्रपती ट्रम्प यांना धक्का, मिशिगन-जॉर्जियामधील केसेस कोर्टानं फेटाळल्या


अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यातील लढत चुरशीची झाली आहे. आता बायडन विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत, मात्र ट्रम्प मतगणनेच्या विरोधात कोर्टात गेल्यानं अंतिम निकाल येण्यासाठी वेळ लागत आहे. दरम्यान राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने दाखल केलेल्या मिशिगन आणि जॉर्जियामधील केसेस कोर्टाने फेटाळल्या आहेत. ट्रम्प यांनी या दोन्ही राज्यांमधील पोस्टल बॅलेट मतगणना थांबवण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी कोर्टाने फेटाळली आहे.


दुसरीकडे जो बायडन यांनी आपल्या समर्थकांकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. कायद्याच्या लढाईमध्ये मदतीसाठी बायडन यांनी आवाहन केलं आहे.अमेरिकेत कायद्याची लढाई लढणं हे फार खर्चिक आहे. यासाठी जवळपास 75 कोटी रुपयांचा खर्च येऊ शकतो. त्यामुळं ट्रम्प कोर्टात गेल्यानंतर बायडन यांच्या टीमनं तात्काळ 'बायडन फाईट फंड' स्थापन केला आहे. बायडन यांच्यासाठी आर्थिक मदतीचं आवाहन या माध्यमातून केलं आहे.


जॉर्जियातील मुकाबला रोमांचक
जॉर्जियामध्ये ट्रंप आणि बायडन यांच्यातील मुकाबला रोमांचक झाला आहे. या ठिकाणी दोन्ही उमेदवारांची वोटिंग टक्केवारी समान झाली आहे. दोघांनाही या ठिकाणी 49.4 टक्के मतं मिळाली आहेत.


बायडन बहुमताच्या अगदी जवळ पोहोचले 


बायडन बहुमताच्या अगदी जवळ पोहोचले असून त्यांना 264  इलेक्टोरल वोट मिळाले आहेत, त्यांना विजयासाठी केवळ 6 मतांची गरज आहे. तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर असून त्यांना आतापर्यंत 214 इलेक्टोरल वोट मिळाले आहेत. विजयासाठी उमेदवाराला 270 इलेक्टोरल मतांची गरज आहे. दुसरीकडे निवडणूक प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प सुप्रीम कोर्टात पोहोचले. मतगणनेत घोटाळ्याचा आरोप करत ट्रम्प समर्थकांनी एकीकडे गोंधळ घालायला सुरुवात केली आहे तर दुसरीकडे काही राज्यांमध्ये निकालाविरोधात केसेस करण्यात आल्या आहेत. यामुळं अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा अंतिम निकाल हाती यायला वेळ लागणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. दुसरीकडे जो बायडन यांनी आपल्या समर्थकांकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. कायद्याच्या लढाईमध्ये मदतीसाठी बायडन यांनी आवाहन केलं आहे.


अमेरिकेच्या निवडणुकीत मराठमोळ्या उद्योजकाचा डंका, मिशिगनमधून श्री ठाणेदार झाले आमदार


ट्रम्प यांच्या टीमने आज जॉर्जिया, मिशिगन आणि पेन्सिलवेनिया मध्ये केसेस दाखल केल्या आहेत. तसेच  विस्कोंन्सिन मध्ये पुन्हा मतगणना करण्याची मागणी केली आहे.  डोनाल्ड ट्रंप यांनी ‘बॅटलग्राउंड’ राज्य पेन्सिलवेनिया, मिशिगन, नॉर्थ कॅरोलाइना आणि जॉर्जियामध्ये आपल्या विजयाची घोषणा केली आहे.


बायडन यांना 50.5 टक्के मतं
सीएनएन न्यूजच्या ताज्या आकडेवारीनुसार जो बायडन यांना 50.5 टक्के मतं मिळाली आहेत तर  डोनाल्ड ट्रंप यांना 48 टक्के मतं मिळाली आहेत. बायडन यांना आतापर्यंत 7 कोटी 15 लाख 97 हजार 485 मतं मिळाली आहेत. तर ट्रम्प यांना 6 कोटी 80 लाख 35 हजार 427 मत मिळाली आहेत.  जो बायडन हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले असे राष्ट्रपती पदाचे उमेदवार बनले आहेत. ज्यांना सर्वाधिक मतं मिळाली आहेत. त्यांनी ओबामा यांचाही रेकॉर्ड मोडीत काढला आहे. अमेरिकेतील निवडणुकांमध्ये 2008 साली ओबामा यांना 69,498,516 मतं मिळाली होती. ओबामा यांच्या कार्यकाळात उपराष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या बायडन यांना आतापर्यंत 69,589,840 मतं मिळाली होती. अद्याप लाखो मतांची मोजणी करणं बाकी आहे.


पॉप्युलर मतांमध्ये ट्रम्प यांना टाकलं मागे


अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंत 66,706,923 मतं मिळाली आहेत. लाखो मतांची मोजणी अद्याप बाकी आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पही ओबामांचा रेकॉर्ड मोडू शकतात. दरम्यान, अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये पॉप्युलर मतं मिळवणाराच उमेदवार राष्ट्रपती पदी विराजमान होतो, असं नाही. निवडणूकांमध्ये विजय मिळवण्यासाठी 270 किंवा त्याहून अधिक इलेक्ट्रोल मतं मिळवणं आवश्यक असतं. आतापर्यंत बायडन यांना 264 मतं मिळाली आहेत, तर ट्रम्प यांच्या खात्यात 214 इलेक्ट्रोरल मतं आहेत.


या राज्यांची मतगणना बाकी


अमेरिकेत एकूण 50 राज्य आहेत. यापैकी आतापर्यंत 22 राज्यांमध्ये ट्रम्प यांनी तर 20 राज्यांमध्ये बायडन यांनी विजय मिळवला आहे.तर आठ राज्यांचा निकाल येणं अद्याप बाकी आहे. यात तीन सीट असेलेलं अलास्का, 11 सीट असलेलं एरिजोना, 16 सीट असलेलं जॉर्जिया, चार सीट असलेलं मेन,  पाच सीट असलेलं नेबरास्का, सहा जागा असलेलं  नेवाडा, 15 सीट असलेलं नॉर्थ कॅरोलीना आणि 20 सीट असलेलं पेनसिलवेनिया या राज्यांचा निकाल येणं बाकी आहे. या राज्यांमध्ये एकूण 77 इलेक्टोरल वोट्स आहेत. या मतांवर आता ट्रम्प आणि बायडन यांचं भवितव्य अवलंबून आहे.


या राज्यांमध्ये जिंकले ट्रम्प


डोनाल्ड ट्रम्प यांनी इदाहो, लोवा, फ्लोरिडा, साउथ डकोटा, मिसौरी, लुइसियाना, नेब्रास्का, नॉर्थ डकोटा, अरकांसस, अलबामा, मिसिसिपी, मोनटाना, ओहियो, ओक्लाहोमा, टेनेसी, केंटकी, वेस्ट वर्जीनिया, व्योमिंग, टेक्सास, साउथ कॅरोलिना, इंडियाना, उताह आणि वियोमिंग मध्ये आतापर्यंत विजय मिळवला आहे.


बायडन यांनी या राज्यांमध्ये विजय मिळवला


बायडन यांनी वेस्ट वर्जीनिया, वॉशिंगटन कॅलिफोर्निया, कोलोराडो, न्यू हॅम्पशायर, डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया, न्यूयॉर्क, न्यू मॅक्सिको, वर्मोंट, कनेक्टिकट, डेलावेयर, इलिनोइस, मैरीलँड, मैसाचुसेट्स, न्यू जर्सी, टेनेसी ओरेगन, विस्कॉन्सिन, रोड आयलँड, वरमोंट, हवाई, मिशिगन, मिनेसोटा आणि रोड आयलँडमध्ये आतापर्यंत विजय मिळवला आहे.


प्रक्रियेवर आणि एकमेकांवर विश्वास ठेवा, आपण जिंकू- बायडन
अध्यक्षपदाच्या निवडणुकी जो बाइडन विजयाच्या जवळ पोहोचले आहेत. त्यामुळे आता त्यांना आपल्या विजयाबाबत खात्री असल्याचं दिसत आहे. त्यांनी आज पहाटे साडेपाचच्या सुमारास केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "या प्रक्रियेवर आणि एकमेकांवर विश्वास ठेवा, आपण जिंकू." बायडन म्हणाले की, चित्र आता स्पष्ट आहे, आपण चांगल्या मतांनी जिंकत असल्याचे दिसत आहे. जेव्हा मतगणना थांबेल तेव्हा आपणच विजेता असणार आहोत.  ते म्हणाले हा विजय केवळ माझा किंवा आपला नसेल तर हा विजय प्रत्येक अमेरिकी नागरिकांचा असेल.


मिशिगन आणि पेंसिल्वेनियामधील मतगणनेविरोधात कोर्टात जाण्याच्या निर्णयावर ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, आपल्या वकीलांनी याबाबत चर्चा केली आहे. मात्र ही बाब चांगली नाही. आपली व्यवस्था आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला आधीच खूप नुकसान पोहोचवण्यात आलं आहे, यावर चर्चा झाली पाहिजे, असं ते म्हणाले.


US Elections 2020 : इलेक्टोरल वोटिंगमध्ये बायडन आघाडीवर, तर आतापर्यंत 22 पैकी 12 राज्यात ट्रम्प जिंकले



संबंधित बातम्या


US Elections : अमेरिकन राष्ट्रपतीपदाची निवडणूक रोमांचक टप्प्यावर! निकाल लांबणीवर, मतगणनेत घोटाळ्याचा आरोप


US Elections: 'माझ्यासाठी जिंकणं सोपं, हार पचवणं कठिण', मतदानादरम्यान ट्रम्प यांचं ट्वीट


US Election Results LIVE | बायडन 270 च्या जादुई आकड्याजवळ पोहोचले, ट्रम्प अद्याप मागे