US Election Results LIVE | आपण कुणाचे विरोधक असू शकतो मात्र दुश्मन नाही - जो बायडन

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प और जो बायडन यांच्यात लढत सुरु आहे. सुरुवातीला ट्रम्प आघाडीवर होते आता बायडन यांनी आघाडी घेतली आहे. दोन्ही उमेदवार आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. याचदरम्यान ट्रम्प यांनी विरोधकांवर निवडणुकीत घोटाळा केल्याचाही आरोप केला आहे. रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा बाजी मारणार की डेमोक्रेटचे जो बिडेन जिंकणार याकडे अख्ख्या जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या ताज्या अपडेट्ससाठी एबीपी माझा लॉग करा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Nov 2020 02:38 PM
बायडन आता एरिजोना, जॉर्जिया आणि पेनसिल्वेनियामध्ये ट्रम्प यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत. बायडन म्हणाले की, आम्ही 24 वर्षांनंतर एरिजोना आणि जॉर्जिया जिंकणार आहोत. ते म्हणाले की, मला कल्पना आहे की, या अवघड निवडणुकीनंतक तणाव वाढू शकतो मात्र आपल्याला शांतता राखायची आहे. आपण विरोधी असू शकतो मात्र दुश्मन नाही, असं बायडन म्हणाले. बायडन पेनसिल्वेनियामध्ये 9,000 तर जॉर्जियामध्ये 1,500 हून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.
अमेरिकेचे हाउस स्पीकर आणि काँग्रेसचे टॉप डेमोक्रेट नॅन्सी पेलोसी यांनी जो बायडन यांना अमेरिकेचे "प्रेसिडेंट इलेक्ट " असं म्हटलं आहे. पेलोसी यांनी म्हटलं की, बायडन आणि कमला हॅरिस विजयाच्या जवळ आहेत. तर ट्रम्प यांचे निवडणूक अभियान अधिकारी मॅट मॉर्गन यांनी म्हटलंय की, निवडणूक अजून संपलेली नाही. बायडन स्वत:ला चार राज्यांच्या आघाडीच्या जोरावर विजेता झाल्याचं सांगत आहेत. मात्र फायनल निकाल अद्याप बाकी आहे. जॉर्जियामध्ये दुसऱ्यांदा वोटिंग होईल, आम्हाला विश्वास आहे की, राष्ट्रपती ट्रम्प नक्की बाजी मारतील. राष्ट्रपती ट्रम्प यांनी म्हटलंय की, मी या चारही राज्यात काल रात्रीपर्यंत आघाडीवर होतो. आता आश्चर्यकारक पद्धतीनं आघाडी गेली. आमची कायदेशीर लढाई सुरु आहे. आम्ही पुन्हा आघाडी मिळवू, असं ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेत मागील चार दिवसांपासून मतगणना सुरु आहेत. अद्यापही अमेरिकेचा राष्ट्रपती होणार याबाबत चित्र स्पष्ट नाही. मात्र सध्या बायडन हे आघाडीवर असून ते विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. डेमोक्रेटिक पार्टीचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार जो बायडन यांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे.
जो बायडन म्हणाले की, आम्ही स्पष्ट बहुमताने विजयी होणार आहोत. त्यांनी सांगितलं की, आम्हाला 7.40 कोटींहून अधिक मतं मिळाली आहेत, जे आजवरच्या अमेरिकेच्या इतिहासात राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला मिळालेली सर्वाधिक मतं आहेत. व्हाईट हाउसमध्ये पोहोचण्यासाठी उमेदवाराला 538 ‘इलेक्टोरल कॉलेज वोट’ पैकी 270 मतं मिळवणं गरजेचं आहे. ताज्या आकडेवारीनुसार बायडन यांना 264 इलेक्टोरल कॉलेज वोट मिळाले आहेत तर ट्रम्प यांना 213 मतं मिळाली आहेत.
जॉर्जियामध्ये ट्रंप आणि बायडन यांच्यातील मुकाबला रोमांचक झाला आहे. या ठिकाणी दोन्ही उमेदवारांची वोटिंग टक्केवारी समान झाली आहे. दोघांनाही या ठिकाणी 49.4 टक्के मतं मिळाली आहेत.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यातील लढत चुरशीची झाली आहे. आता बायडन विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत, मात्र ट्रम्प मतगणनेच्या विरोधात कोर्टात गेल्यानं अंतिम निकाल येण्यासाठी वेळ लागत आहे. दरम्यान राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने दाखल केलेल्या मिशिगन आणि जॉर्जियामधील केसेस कोर्टाने फेटाळल्या आहेत. ट्रम्प यांनी या दोन्ही राज्यांमधील पोस्टल बॅलेट मतगणना थांबवण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी कोर्टाने फेटाळली आहे.
मिशिगनमध्ये घोडं अडलं, मिशिगनमधील मतगणनेमुळं निकाल स्पष्ट नाही, ट्रम्प आणि बायडन दोघांनी केला विजयाचा दावा
अंतिम निकाल हाती यायला वेळ लागणार, बॅटलग्राउंड राज्य असलेल्या नेवादामध्ये 12 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार मतगणना

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यात चुरशीची लढत झाली आहे. आता बायडन विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. बायडन बहुमताच्या अगदी जवळ पोहोचले असून त्यांना 264 इलेक्टोरल वोट मिळाले आहेत, त्यांना विजयासाठी केवळ 6 मतांची गरज आहे. तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर असून त्यांना आतापर्यंत 214 इलेक्टोरल वोट मिळाले आहेत. विजयासाठी उमेदवाराला 270 इलेक्टोरल मतांची गरज आहे.
सीएनएन न्यूजच्या ताज्या आकडेवारीनुसार जो बायडन यांना 50.5 टक्के मतं मिळाली आहेत तर डोनाल्ड ट्रंप यांना 48 टक्के मतं मिळाली आहेत. बायडन यांना आतापर्यंत 7 कोटी 15 लाख 97 हजार 485 मतं मिळाली आहेत. तर ट्रम्प यांना 6 कोटी 80 लाख 35 हजार 427 मत मिळाली आहेत. जो बायडन हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले असे राष्ट्रपती पदाचे उमेदवार बनले आहेत. ज्यांना सर्वाधिक मतं मिळाली आहेत. त्यांनी ओबामा यांचाही रेकॉर्ड मोडीत काढला आहे. अमेरिकेतील निवडणुकांमध्ये 2008 साली ओबामा यांना 69,498,516 मतं मिळाली होती. ओबामा यांच्या कार्यकाळात उपराष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या बायडन यांना आतापर्यंत 69,589,840 मतं मिळाली होती. अद्याप लाखो मतांची मोजणी करणं बाकी आहे.
मतगणनेत घोटाळ्याचा आरोप करत ट्रम्प समर्थकांनी एकीकडे गोंधळ घालायला सुरुवात केली आहे तर दुसरीकडे काही राज्यांमध्ये निकालाविरोधात केसेस करण्यात आल्या आहेत. यामुळं अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा अंतिम निकाल हाती यायला वेळ लागणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. दुसरीकडे जो बायडन यांनी आपल्या समर्थकांकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. कायद्याच्या लढाईमध्ये मदतीसाठी बायडन यांनी आवाहन केलं आहे.

राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिकचे उमेदवार जो बायडन यांच्यात कांटे की टक्कर सुरुय. मात्र निवडणूक निकालाआधीच बायडन यांनी एक मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रपती झाल्यानंतर सर्वात आधी पॅरिस क्लायमेट डीलमध्ये पुन्हा सहभागी होण्याची घोषणा त्यांनी केलीय.
अमेरिकेच्या निवडणुकीत स्थिती बदलताना दिसत आहे. मिशिगनच्या मतमोजणीत डोनाल्ड ट्रम्प हे बायडन यांच्या पुढे जात असल्याचे चित्र आहे.
डोनाल्ड ट्रंप यांच्याकडे यावेळी 214 इलेक्टोरल कॉलेज वोट आहेत. त्यांना बहुमतासाठी आणखी 56 मतांची गरज आहे. आता ज्या राज्यात ट्रम्प लीडवर असल्याचे सांगितले जात आहे, तिथं ते समजा जिंकलेही तरी त्यांना 54 मतं मिळू शकतात. त्याची बेरीज करुनही ट्रम्प बहुमताचा 270चा आकडा गाठू शकणार नाहीत.
बायडन यांना विजयासाठी 6 मतांची गरज आहे. नेवादामध्ये बायडन लीडवर आहेत. जर बायडन नेवादामध्ये जिंकले तर त्यांच्या खात्यात सरळ 6 मतं येतील आणि ते बहुमत प्राप्त करु शकतील.
अध्यक्षपदाच्या निवडणुकी जो बाइडन विजयाच्या जवळ पोहोचले आहेत. त्यामुळे आता त्यांना आपल्या विजयाबाबत खात्री असल्याचं दिसत आहे. त्यांनी आज पहाटे साडेपाचच्या सुमारास केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "या प्रक्रियेवर आणि एकमेकांवर विश्वास ठेवा, आपण हे जिंकू."

रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप दुसऱ्यांदा जिंकणार की डेमोक्रेटचे उमेदवार जो बायडन बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अमेरिकेतील सर्व 50 राज्‍यांमध्ये सोबतच निवडणूक पार पडत आहे. जवळपास 24 कोटी मतदाता मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
इलेक्टोरल मतदानामध्ये डेमोक्रेटचे उमेदवार बायडन हे ट्रम्प यांच्या पुढे आहेत. जो बायडन यांना आतापर्यंत 223 तर ट्रम्प यांना 204 इलेक्टोरल मतं मिळाली आहेत. अमेरिकेत एकूण इलेक्टर्सची संख्या 538 आहे आणि बहुमतासाठी 270 चा आकडा गाठायचा आहे.
मतगणनेच्या पार्श्वभूमीवर व्हाईट हाऊसची सुरक्षा वाढवली आहे. या ठिकाणी कडक सुरक्षेची व्यवस्था केली आहे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक रंजक टप्प्यावर आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिकचे उमेदवार जो बायडन यांच्यात अटी-तटीचा सामना सुरु आहे. दरम्यान मतमोजणी सुरु असताना डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांनी पत्रकार परिषद घेत एकमेकांवर आरोप करत कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. सध्या पेंसिल्वेनिया मध्ये मतगणना थांबवण्यात आली आहे. तिथं आता उद्या मतगणना होणार आहे. त्यामुळं अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या अंतिम निकालासाठी आता वाट पाहावी लागणार आहे. डोनाल्ड ट्रंप यांनी मतगणनेबाबत घोटाळ्याचा आरोप करत सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे, तर बायडन यांनी देखील कोर्टात जाण्याबाबत भाष्य केलं आहे.
पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या विजयाचा दावा केला. तसंच ट्रम्प यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचाही आरोप केला. ते म्हणाले की, पुढील मतदान थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. ट्रम्प यांनी जो बायडेन आणि डेमोक्रॅटसवर निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. आपण या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. आपण जिंकणारच होतो, म्हणजे आपण जिंकलोच आहोत, असे ट्रम्प व्हाईट हाऊसमधल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

अमेरिकेत यंदा राष्टपदीपदासाठी विक्रमी मतदान झालं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेतील ओरेगन हे पाचवं राज्य आहे, जिथं 2016 च्या निवडणुकीपेक्षा अधिक मतदान झालं आहे. यावेळी 10 कोटी अमेरिकन नागरिकांनी निवडणुकीआधीच पोस्टल मतदानादावारे आपलं मतदान केलं होतं. यामुळं यंदा विक्रमी मतदान झालं असल्याचा अंदाज आहे.
वॉशिंग्टन: अमेरिकेत नवी राष्ट्रपतीपदासाठी मतदान सुरु आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता मतदान प्रक्रिया थांबेल. मतदान झाल्यानंतर लगेच मतगणना सुरु होणार आहे.
रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा बाजी मारणार की डेमोक्रेटचे जो बिडेन जिंकणार याकडे अख्ख्या जगाचे लक्ष लागले आहे. यातच ट्रम्प यांनी ट्वीट करत आपणच जिंकणार असल्याचा दावा केला आहे.

पार्श्वभूमी

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प और जो बायडन यांच्यात लढत सुरु आहे. सुरुवातीला ट्रम्प आघाडीवर होते आता बायडन यांनी आघाडी घेतली आहे. दोन्ही उमेदवार आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. याचदरम्यान ट्रम्प यांनी विरोधकांवर निवडणुकीत घोटाळा केल्याचाही आरोप केला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या ताज्या अपडेट्ससाठी एबीपी माझा लॉग करा


अमेरिकेत नवी राष्ट्रपतीपदासाठीची मतदानाची प्रक्रिया काल (4 नोव्हेंबर) भारतीय वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता थांबल्यानंतर मतमोजणी सुरु झाली. रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा बाजी मारणार की डेमोक्रेटचे जो बिडेन जिंकणार याकडे अख्ख्या जगाचे लक्ष लागले आहे. यातच ट्रम्प यांनी ट्वीट करत आपणच जिंकणार असल्याचा दावा केला आहे.

विक्रमी मतदान
अमेरिकेत यंदा राष्टपदीपदासाठी विक्रमी मतदान झालं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेतील ओरेगन हे पाचवं राज्य आहे, जिथं 2016 च्या निवडणुकीपेक्षा अधिक मतदान झालं आहे. यावेळी 10 कोटी अमेरिकन नागरिकांनी निवडणुकीआधीच पोस्टल मतदानादावारे आपलं मतदान केलं होतं. यामुळं यंदा विक्रमी मतदान झालं असल्याचा अंदाज आहे. रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप दुसऱ्यांदा जिंकणार की डेमोक्रेटचे उमेदवार जो बायडन बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अमेरिकेतील सर्व 50 राज्‍यांमध्ये सोबतच निवडणूक पार पडत आहे. जवळपास 24 कोटी मतदाता मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.