न्यूयॉर्क : जगातील एकूण खाद्यपदार्थांपैकी 17 टक्के खाद्यपदार्थ दरवर्षी वाया जात असल्याचा धक्कादायक खुलासा संयुक्त राष्ट्र संघटनेनं केला आहे. दरवर्षी वाया जाणारे खाद्यपदार्थ हे 930 मेट्रिक टन इतके आहेत. या वाया जाणाऱ्या खाद्यपदार्थांमुळे वातावरण बदलाच्या संकटालाही तोंड द्यावं लागतंय असंही या अहवालात म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) चा Food Waste Index Report 2021 गुरुवारी जाहीर झाला आहे. त्यामध्ये हा खुलासा करण्यात आला आहे.


जगभरात जेवढे खाद्यपदार्थ वाया जातात त्यापैकी 61 टक्के खाद्यपदार्थ हे घरातून फेकले जातात. तसेच हॉटेलसारख्या खाद्य सेवांच्या ठिकाणी वाया जाणारे अन्न हे 26 टक्के आहे आणि फूटपाथवरील विक्रेत्यांकडून वाया जाणाऱ्या खाद्यपदार्थाचा दर हा 13 टक्के आहे. जगातल्या अनेक देशातील असंख्य लोक हे उपाशी पोटी झोपी जात असताना इतक्या मोठ्या प्रमाणात वाया जाणाऱ्या अन्नावर संयुक्त राष्ट्राने नाराजी व्यक्त केली आहे. हे अशा प्रकारे अन्न वाया जाऊ नये यासाठी संयुक्त राष्ट्र संघटना काम करत आहे.





परदेशात राहणाऱ्या भारतीयांची संख्या 1.8 कोटी, सर्वात जास्त युएईमध्ये- संयुक्त राष्ट्र


आफ्रिका आणि आशियातील अनेक देशात लोकांना खायला अन्न मिळत नाही. या देशात दहशतवाद, युद्ध परिस्थिती किंवा कायमस्वरुपी दुष्काळ अशा समस्या आहेत. या व्यतिरिक्त त्याला इतरही वेगवेगळी कारणं आहेत. अशा स्थितीत त्या देशातील लोकांना अन्न उपलब्ध करून देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीनं काम केलं जातंय.


वाया जाणाऱ्या खाद्यपदार्थांचं प्रमाण आपण जर कमी केलं तर त्यामुळे ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन कमी होऊन पर्यावरणाचा ऱ्हास कमी होऊ शकतो. त्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनावर जो काही भला मोठा खर्च होतोय तो कमी करता येईल असं मत युनायटेड नेशन एनव्हायरमेन्ट प्रोग्रामच्या प्रमुखांनी व्यक्त केलंय.


जर आपल्याला वातावरण बदलाच्या संकटाला सामोरं जायचं असेल आणि जैवविविधतेचा ऱ्हास कमी करायचा असेल तर इतक्या मोठ्या प्रमाणावर वाया जाणारं अन्न वाचवायला हवं असंही संयुक्त राष्ट्राच्या या अहवालात सांगण्यात आलं आहे.


पहा व्हिडीओ: भारतात प्रत्येक घरात दरवर्षी प्रतिव्यक्ती 50किलो अन्न वाया,संयुक्त राष्ट्र पर्यावरणाचा अहवाल



International Volunteers Day 2020 | आज आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस, का साजरा केला जातो हा दिवस?