नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्राने आपल्या 'इंटरनॅशनल मायग्रेशन 2020 हायलाइट्स' या अहवालात असं म्हटलं आहे की भारतातील 1.8 कोटी लोकसंख्या ही जगभर वास्तवास आहे. यामध्ये सर्वाधिक भारतीय लोकसंख्या ही युएईमध्ये (UAE) वास्तव करते असेही या अहवालाच्या हायलाइट्मध्ये सांगण्यात आलं आहे.


संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक गोष्टींशी संबंधित विभागाने (UN Department of Economic and Social Affairs) जगभरातल्या स्थलांतरित लोकांवर आधारित 'इंटरनॅशनल मायग्रेशन 2020 हायलाइट्स' हा अहवाल जाहीर केला आहे. त्यामध्ये सांगण्यात आलं आहे की भारतातील लोक सर्वाधिक प्रमाणात जगभरात पसरले आहेत. त्यामध्ये असंही सांगण्यात आलंय की संयुक्त अरब अमिरात, अमेरिका आणि सौदी अरबमध्ये सर्वाधिक संख्येने भारतीय लोक वास्तव करतात.


Pravasi Bharatiya Divas 2021: भारतात का साजरा केला जातो 'प्रवासी भारतीय दिवस?' काय आहे या दिवसाचं महत्व?


संयुक्त राष्ट्राच्या या अहवालानुसार संयुक्त अरब अमिरात (United Arab Emirates) मध्ये 35 लाख भारतीय राहतात. त्यानंतर अमेरिकेत 27 लाख भारतीय लोक राहतात. तिसरा क्रमांक हा सौदी अरबचा लागत असून त्या देशात जवळपास 25 लाख भारतीय राहतात.


प्रामुख्याने रोजगारासाठी हे स्थलांतर करण्यात येत असल्याचं या अहवालात सांगण्यात आलंय. प्रदेशांच्या स्वरुपात सांगायचं तर आखाती देशांत सर्वाधिक भारतीय लोक स्थलांतरित झाले आहेत. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कुवैत, ओमान, पाकिस्तान, कतार आणि ब्रिटनमध्येही अनेक प्रवासी भारतीय राहत असल्याचे या अहवालात स्पष्ट केलंय.


NRI | अनिवासी भारतीयांना मिळणार मतदानाचा अधिकार, निवडणूक आयोगाचा केंद्र सरकारकडं प्रस्ताव


स्थलांतरितांच्या संख्येत भारतानंतर मेक्सिको आणि रशियाचा क्रमांक लागतोय असं या अहवालात स्पष्ट केलंय. मेक्सिको आणि रशियाचे प्रत्येकी 1.1 कोटी लोक जगभरात वास्तव करतात. त्यानंतर चीनचा क्रमांक लागत असून त्या देशातील एक कोटी लोक जगभरात पसरले आहेत. सिरिया या देशातील 80 लाख लोकांनी आपला देश सोडला असून त्यांनी जगातल्या इतर देशांचा सहारा घेतल्याचं या अहवालात सांगण्यात आलंय.


जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 3.6 लोकसंख्या ही स्थलांतरीत असल्याचंही या अहवालात सांगण्यात आलंय.


US Elections : कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती; भारताशी त्यांचा काय संबंध?