Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध अद्याप सुरुच आहे. एकीकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन अणुयुद्धाच्या तयारीत आहेत तर, दुसरीकडे या युद्धाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये चर्चाही सुरू आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील महत्त्वाची आणि ऐतिहासिक चर्चेची पहिली फेरी बेलारूसमध्ये पार पडली. अनेक तास चाललेल्या बैठकीत प्रश्न सुटला नाही. दोन्ही देश कोणताही ठोस निर्णय घेऊ शकलेले नाहीत. चर्चेदरम्यान, युक्रेनने रशियाने क्रिमिया आणि डॉनबाससह संपूर्ण देशातून आपले सैन्य मागे घ्यावे अशी मागणी केली आहे. चर्चेची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर लवकरच चर्चेची दुसरी फेरी होणे अपेक्षित आहे जेणेकरून लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने पावले उचलता येतील.


युक्रेनचे संकट सोडवण्यासाठी अणुयुद्ध की चर्चा?
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध रोखण्यासाठी चर्चेच्या दुसऱ्या फेरीपूर्वी दोन्ही देशांचे शिष्टमंडळ चर्चेसाठी मॉस्को आणि कीव येथे परततील. याआधीही युक्रेनने तात्काळ युद्ध थांबवण्याची आणि युक्रेनमधून रशियन सैनिकांना माघार घेण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर युक्रेनच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेत विशेष सत्र सुरू आहे. बहुतेक देशांनी रशियाने हल्ला थांबवण्याचा आणि चर्चेतून या समस्येवर तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. यूएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनीही म्हटले आहे की, 'रशियन सैन्याने आता युक्रेन सोडले पाहिजे. हा प्रश्न चर्चेने सोडवला पाहिजे कारण प्रश्न शांततेनेच सुटतो.'


युद्धादरम्यान पुतिन कोणती पावले उचलू शकतात?
रशियाने आपल्या सैन्याला अणुयुद्धाच्या तयारीसाठी सतर्क केले आहे. पुतिन पुढे काय करू शकतील याबद्दल निश्चितपणे काहीही सांगता येत नाही, परंतु त्यांचे पुढचे पाऊल काय असेल याबाबतची शक्यता वर्तवली जात आहे. एक म्हणजे पुतिन युक्रेनवर हल्ला थांबवण्याची अट ठेवू शकतात. युक्रेनशी वाटाघाटीबाबत चर्चा करून हल्ले थांबवले जाऊ शकतात. आणखी एक शक्यता अशीही वर्तवली जात आहे की, देश ताब्यात घेऊन रशियाने तिथल्या सरकारचा ताबा घ्यावा अन्यथा कीव्हवर कब्जा करून तत्काळ सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न व्हावा. तिसरी शक्यता म्हणजे युद्धाची व्याप्ती वाढवली जाऊ शकते. युक्रेनसोबतच त्यांना मदत करणाऱ्या देशांवरही रशियाकडून हल्ला होऊ शकतो. या शक्यतेमुळे जगात तिसऱ्या महायुद्धाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha