Satya Nadella Son Death : सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्ट (Microsoft corp.) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) सत्या नडेला यांचा मुलगा झैन नडेला ( Zain Nadella) याचं सोमवारी सकाळी निधन झालं आहे. तो 26 वर्षांचा होता. तो जन्मापासूनच सेरेब्रल पाल्सी या आजाराशी झुंज देत होता. 


मुख्य कार्यकारी अधिकारी झाल्यापासून नडेला यांनी, दिव्यांग वापरकर्त्यांना चांगली सेवा देण्याच्या उद्देशानं कंपनीच्या उत्पादन डिझाइनवर लक्ष केंद्रित केलं आहे. झेनचं पालनपोषण करताना त्यांना खूप काही शिकायला मिळाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. गेल्या वर्षी, सिएटलच्या चिल्ड्रन्स न्यूनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट (Children’s  Neonatal Intensive Care Unit (NICU) ने सत्या नडेला यांच्यासोबत सिएटल चिल्ड्रन सेंटर फॉर इंटिग्रेटिव्ह ब्रेन रिसर्चचा भाग म्हणून सहकार्य केलं आहे. त्यांनी झेन नडेला एंडोड चेअर इन पेडियाट्रिक न्यूरोसायन्सेस (Zain Nadella Endowed Chair in Pediatric Neurosciences) ची स्थापना केली होती. 


कंपनीनं दिली माहिती 


कंपनीनं कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे याची माहिती दिली आहे. सॉफ्टवेअर कंपनीनं आपल्या कार्यकारी कर्मचार्‍यांना ईमेलद्वारे कळवले की, झैनचं निधन झालं आहे. या संदेशात अधिकाऱ्यांना त्याच्या कुटुंबासाठी प्रार्थना करण्यास सांगितलं आहे.


चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे सीईओ जेफ स्पिरिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, "झेनला संगीताची उत्तम जाण होती. त्याचं तेजस्वी स्मित आणि त्यानं आपल्या कुटुंबासाठी आणि प्रियजनांना दिलेला आनंद सदैव स्मरणात राहील."


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha