Russia Ukraine War : रशियाचे (Russia) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या आदेशानुसार रशियन सैन्याने युक्रेनवर (Ukraine) हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. रिपोर्टनुसार, रशियाच्या सैन्यानं अद्याप मोठ्या प्रमाणावर हल्ला केला नसला तरी युक्रेनची राजधानी कीव आणि खार्किव शहराच्या विविध भागात स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. पण सध्या रशिया आणि युक्रेन यांच्या या युद्धाबरोबरच युक्रेन सैनिकांच्या फ्लर्टी मेसेजची देखील चर्चा होत आहे. रिपोर्टनुसार, रशियाचे सैनिक हे युक्रेन महिलांना फ्लर्टी मेसेज करत आहेत. युक्रेनमधील एक महिला असा दावा करत आहे की, एक रशियन सैनिक तिला टिंडर (Tinder) या अॅपवरून मेसेज करत आहे. कीवमध्ये राहणाऱ्या या महिलेचं नाव दशा सिनेलनिकोवा असं आहे. गेली काही दिवस रूसी सैनिक हे दशा सिनेलनिकोवाला टिंडरवर रिक्वेस्ट पाठवत आहे तसेच मेसेज देखील करत आहे.
आंद्रेई, अलेक्जेंडर, ग्रेगरी अशा नावानं रशियाच्या सैनिकांनी टिंडर अॅपवर प्रोफाइल तयार केलं आहे. या प्रोफाइल्स सैनिकांनी युक्रेन महिलांना आकर्षित करण्यासाठी तयार केले आहे. दशानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, तिच्या एका मैत्रीणीनं तिला सांगितलं, की रशियाचे सैनिक टिंडर प्रोफाइल तयार करून अॅपमध्ये त्यांचे लोकेशन खार्किव हे सेट करत आहेत. रशियाचे सैन्य हे युक्रेनचे दुसरे सर्वात मोठे शहर खार्किवपासून अवघ्या 20 मैलावर आहे.
दशानं सांगितलं की 31 वर्षाचा आंद्रेई (कथित रशियन सैनिक) या सोबत ती मेसेजवर गप्पा मारत होती. दशानं सांगितलं की, आंद्रेईला तिनं विचारलं की, 'तु कुठे राहतो? तु खार्किवमध्ये राहतोस का?' आंद्रेईनं सांगितलं की, 'मी खार्किवमध्ये नाही राहात पण मी जवळ राहतो'पुढे दशानं विचारलं, 'तु इथे येऊ शकतो का?' तर आंद्रेईने उत्तर दिले, '2014 पासून युक्रेनमध्ये रशियान लोकांचं स्वागत केलं जात नाही' त्यानंतर दशानं विचारलं, तु काय काम करतोस? या दशाच्या प्रश्नाला आंद्रेईने उत्तर देणं टाळलं. '
दशा म्हणाली की टिंडरवर तिला पाठवलेल्या फोटोमध्ये, बंदूक दिसत होती. पुढे ती म्हणाली,'मी माझ्या शत्रूसोबत बोलू शकत नाही मी त्याची रिक्वेस्ट डिलीट केली. पण असे बरेच लोक होते जे मेसेज करत होते.'
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Russia Ukraine War : हंगेरीसह अनेक देशांमार्गे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढणार
- Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन वादावर केवळ संवादातून मार्ग निघेल; पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेत मोदींचे आवाहन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha