Russia Ukraine War : रशिया युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. यामध्ये अनेक भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या भारतीय विद्यार्थ्यांना, नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता युक्रेन शेजारील देशांमध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची टीम जाणार आहे. हंगेरी, पोलंड, रोमानियासह अनेक देशांमार्गे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढणार आहे.
युक्रेनमध्ये भारतातील तब्बल 18 हजार भारतीय अडकले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.तेथील परिस्थिती अधिकच चिघळल्यामुळे भारतीयांना एयरलिफ्ट करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहे. युद्धमुळे हवाई सीमा बंद आहेत, त्यामुळे भारतीयांना आणण्यासाठी इतर मार्गाचा विचार केला जात आहे. विदेश राज्य मंत्री व्ही मुरलीधरन यांनी सर्व भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले आहे.
रशिया युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेत. या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाचं विमान युक्रेनमध्ये गेले होतं. मात्र, युद्धामुळे युक्रेन विमानतळ बंद करण्यात आलंय. त्यामुळे विमान माघारी परतले
आतापर्यंत 50 रशियन सैन्याचा खात्मा
रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. बॉम्बस्फोटासाठी क्षेपणास्त्रांचा वापर सुरूच आहे. यावर युक्रेनने डझनभर रशियन सैनिक मारल्याचा दावा केला आहे. त्यात म्हटले आहे की, युक्रेनच्या लष्कराने आतापर्यंत ५० रशियन सैन्याचा खात्मा केला आहे आणि पूर्वेकडील ६ युद्धनौका नष्ट केल्या आहेत. दुसरीकडे, सुरक्षा कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये रशियन लष्करी वाहने क्रिमियामधून युक्रेनमध्ये प्रवेश करत असल्याचे दिसून आले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या घोषणेनंतर रशियन लष्कराने गुरुवारी युक्रेनविरुद्ध लष्करी कारवाई सुरू केली. रशियाच्या या कृतीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध होत आहे. पुतिन यांनी इतर देशांनाही इशारा दिला आहे की, रशियन कारवाईत हस्तक्षेप करण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास असे त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचे कारण काय? जाणून घ्या पाच महत्त्वाचे मुद्दे
- Russia Ukraine Conflict : युक्रेनमध्ये अडकलेले 242 भारतीय मायदेशी परतले
- Russia Ukraine War : युक्रेनची राजधानी कीवमध्ये अनागोंदी; शहर सोडण्यासाठी नागरिकांची धावपळ, मोठी वाहतूक कोंडी