Ukraine Russia War : युद्धामुळे युक्रेन (Ukraine) देशातील मोठी शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. जेव्हा रशियाने युक्रेनवर हल्ला केला, तेव्हा एक महिला आपल्या 17 वर्षांच्या मुलीसह हॉस्पिटलमध्ये जात होती. त्या मुलीली हाडांचा कॅन्सर असून त्या दिवशी तिचे ऑपरेशन होणार होते. पण याच दरम्यान रशियाने तिथे हल्ला केला. हा हल्ला पाहून कीव (kyiv) येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमधील त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सुरक्षेसाठी घरी जाण्याचा सल्ला दिला.


सुमारे 40 लाख लोकांचे स्थलांतर
कुटुंबाला लवकरच समजले की मुलीवर उपचार सुरू ठेवायचे असतील तर परदेशात जाणे हा एकमेव पर्याय आहे. महिला म्हणाली, "आम्ही हा निर्णय घेण्यास मागेपुढे पाहिले नाही, कारण या युद्धाचा परिणाम केवळ आमच्या जीवनावरच होत नाही तर आमच्या मुलांच्या आरोग्यावरही होतोय. सध्या ती पोलंडमधील वॉर्सा येथे तिच्या मुलीवर उपचार करत आहे. "युद्धाच्या काळात, सुमारे 700,000 लोक रोमानिया आणि मोल्दोव्हा सारख्या शेजारच्या देशांमध्ये पळून गेले आहेत. युनायटेड नेशन्सच्या अहवालानुसार, युद्धादरम्यान सुमारे 40 लाख लोकांनी येथून स्थलांतर केले आहे.


WHO चा इशारा
WHO युरोपचे संचालक हंस क्लुज यांनी गेल्या आठवड्यात एका मुलाखतीत इशारा दिला होता की, दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या युद्धामुळे प्रादेशिक आरोग्य आपत्तीचा धोका वाढू शकतो. आणि हे केवळ एक किंवा दोन देशांपुरती मर्यादित नाही, तर प्रत्यक्षात प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर आहे," असे ते म्हणाले.



आरोग्यसेवेवर मोठा परिणाम
ते म्हणाले की, युद्धाच्या काळात आरोग्य सेवेसाठी लोकांची कमतरता असते, रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसतात, ज्यामुळे युक्रेनच्या आरोग्य सुविधेवर तीव्र परिणाम होताना दिसत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha