Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष सुरूच आहे. त्यातच आता युक्रेनने दावा केला आहे की, या युद्धात आतापर्यंत 15,300 रशियन सैनिक मारले गेले आहेत. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट करून ही माहिती दिली आहे. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दावा केला आहे की, 'युद्धात आतापर्यंत 15,300 रशियन सैनिक मारले गेले आहेत. युक्रेनियन सैन्याने रशियाची एकूण 99 विमाने, 123 हेलिकॉप्टर, 509 रशियन टँक, 24 UAVs, 15 विशेष उपकरणे, 1000 वाहने, 45 विमानविरोधी युद्ध प्रणाली, 1556 विविध चिलखती वाहने नष्ट केली आहेत.'


युक्रेनचे परराष्ट्र मंत्रालय ट्विट करत युक्रेनच्या सैन्याने युद्धात युक्रेन आणि रशियाला झालेल्या नुकसानीची माहिती देत असते. दरम्यान, या माहितीची अधिकृतपणे पुष्टी करण्यात झालेली नाही. युक्रेनला झालेल्या नुकसानीचा माहितीदेखील अस्पष्ट आहे.




 


झेलेन्स्की पुतिन यांच्यासोबत चर्चेसाठी तयार 
युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी सोमवारी रशियाचे राष्ट्राध्याक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी थेट शांतता चर्चेच्या प्रस्तावासाठी तयार असल्याचा पुनरुच्चार केला. झेलेन्स्की यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की युक्रेनियन शहरे उध्वस्त करणाऱ्या जवळपास महिनाभर चाललेल्या युद्धाचा शेवट करण्यासाठी, कोणत्याही स्वरूपात चर्चा करण्यासाठी पुतीन यांच्याशी भेटण्यास आपण तयार आहोत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha