Petrol Diesel Price Hike : इंधन दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. पेट्रोल 84 तर डिझेल 83 पैशांनी महागणार आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून देशात नवे दर लागू होणार आहेत. मंगळवारीही पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्याआधी गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती. युक्रेन-रशिया युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 114 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचल्या आहेत.


उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होणार शक्यता वर्तवली जात होती, ते संकेत खरे ठरले आहेत. शिवाय आगामी काळात पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी म्हणजेच, किरकोळ बाजारात आज सकाळपासून पेट्रोल 84 तर डिझेल 83 पैसे प्रति लिटरने वाढ होणार आहे. मुंबईत सध्या पेट्रोल 110.82 रुपये प्रति लीटर तर डिझेल 95.00 रुपये प्रति लीटर आहे. 


जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 114 डॉलर प्रति बॅरेलवर पोहचली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. मुंबईत सध्या पेट्रोल 109.98 रुपये प्रति लीटर तर डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर आहे. घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात 25 रुपयांची वाढ झाली आहे. 


पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याने महागाई आणखी वाढण्याचा अंदाज असून ट्रान्सपोर्टेशन खर्च वाढण्याची शक्यता आहे. युक्रेन-रशिया युद्ध लांबण्याच्या संकेतामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. युरोपीयन संघातील काही देश रशियावरील तेलावर निर्बंध आणण्याची शक्यता असल्यानं तेलाच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha