Ukraine Russia Crisis : युक्रेन आणि रशियामधील वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. युक्रेनच्या सीमेवरून रशियन सैन्याला तळावर परत बोलावण्यात आले असूनही भीतीदायक वातावरण आहे. ज्यावर अमेरिका आणि चीनसारख्या बड्या देशांच्या नजरा आहेत. दरम्यान, युक्रेनमध्ये राहणाऱ्या हजारो भारतीयांबाबतही चिंता वाढत आहे. येथे राहणारे विद्यार्थी आणि इतर भारतात येण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून एक नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. 


युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या कुटुंबीयांसाठी परराष्ट्र मंत्रालयाने हा कंट्रोल रूम तयार केला आहे. या नियंत्रण कक्षाचा हेल्पलाईन क्रमांकही लोकांसाठी जारी करण्यात आला आहे. दरम्यान कोणाला युक्रेनमधील त्यांच्या नातेवाईकांबद्दल काही माहिती हवी असल्यास ते हेल्पलाईन क्रमांक 01123012113, 01123014104 आणि 01123017905 वर कॉल करू शकतात. 


युक्रेनमधील भारतीय लोकांसाठी हेल्पलाईन क्रमांक :


युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीय लोकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे. या हेल्पलाईन क्रमांकाच्या मदतीने हे लोक फ्लाईट आणि इतर गोष्टींची माहिती गोळा करू शकतात. यासाठी युक्रेनमधील भारतीय एंबेसी +380997300428 आणि 38099730483 या क्रमांकांवर कॉल करू शकतात. या हेल्पलाईन 24 तास सुरू राहणार आहेत. 


काय आहे  युक्रेन-रशिया वाद ?


15 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनच्या सीमेवर तैनात असलेल्या आपल्या हजारो सैन्याला तळावर पाठवण्याचा आदेश जारी केला. त्यानंतर सैनिक परतले. रशिया युक्रेनवर केव्हाही हल्ला करू शकतो, असे याआधी बोलले जात होते. विशेषत: अमेरिका वारंवार असा इशारा देत होती. त्याचवेळी चीन रशियाच्या समर्थनार्थ पुढे आला होता. पण रशियाने चतुराईने या संपूर्ण कवायतीला डावपेच म्हणत स्वतःचा बचाव केला. त्यांचा असा युक्तिवाद आहे की, सैन्याच्या तुकड्या युद्धासाठी किंवा कोणत्याही हल्ल्यासाठी तैनात केल्या गेल्या नाहीत. 


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha