Ukraine Crisis : रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) जवळपास दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या तणावादरम्यान बुधवारी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ANI ने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने माघार घेण्याची घोषणा केली आहे. लष्कराच्या जवानांनी माघार घ्यायला सुरुवात केली आहे.  दोन्ही देशांदरम्यान अनेक दिवसांपासून युद्धाची परिस्थिती आहे. 16 फेब्रुवारीला रशिया युक्रेनवरही हल्ला करू शकतो, असे संकेत स्पष्टपणे दिसत होते. या परिस्थितीवर अमेरिकेनेही युद्ध न करण्यास रशियावर दबाव आणायला सुरुवात केली होती. या सगळ्यात बुधवारी लष्कराच्या माघारीच्या बातमीने मोठा दिलासा मिळाला आहे.