Four-Day Working Week In UK : प्रत्येक ऑफीसमध्ये जाणारी अथवा काम करणारी व्यक्ती आठवड्यातील सुट्टीची आतुरतेने वाट बघत असते. काही कंपन्यांमध्ये एक दिवस तर काही कंपन्यांमध्ये दोन दिवस आठवड्याची सुट्टी असते. मात्र तुम्हांला जर तीन दिवस आठवड्यातून सुट्टी मिळाली तर... होय. ब्रिटनमधील काही कंपन्या प्रायोगिक तत्वावर चार दिवसीय कामकाजाचा आठवडा लागू करणार आहे. जूनपासून महिन्यापासून ही चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या कंपन्यांमधील कामगारांना जून महिना उजाडण्याची वाट पाहत आहेत.
ब्रिटनमधील 60 कंपन्या जून महिन्यापासून कामगारांना आठवड्यात एक अतिरिक्त सुट्टी देणार आहेत. लंडनमधील प्रेशर ड्रॉप ब्रुअरी (The Pressure Drop Brewery) ही कंपनी देखील हा प्रयोग सुरु करणार आहे. यासह ब्रिटनमधील 60 कंपन्या प्रोयागिक तत्वावर चार दिवसांच्या कामकाजाच्या आठवडा लागू करणार आहे. या 60 कंपन्या सहा महिन्यांची चाचणी घेणार आहेत. यामध्ये तीन हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.
पगारात कपात न करता किंवा महसूलात नुकसान न घेता कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास कमी करण्याचं या कंपन्यांचं उद्दिष्ट आहे. स्पेन, आइसलँड, युनायटेड स्टेट्स आणि कॅनडा येथेही अशाच प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड ऑगस्टमध्ये त्यांची चाचणी सुरू करणार आहेत.
लुई ब्लूम्सफिल्ड (36 वर्ष) हा प्रेशर ड्रॉप ब्रुअरीमध्ये कर्मचारी जून महिन्याची आतुरतेने वाट पाहत आहे. या कर्मचाऱ्यांना जून महिन्यापासून आठवड्याला तीन सुट्ट्या मिळणार आहेत. या ब्रुअरला मिळणारी अतिरिक्त सुट्टी कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्यासाठी वापरायची आहे. लुई आणि प्रेशर ड्रॉप ब्रुअरीमधील त्याचे सहकारी चार दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्याच्या सहा महिन्यांच्या चाचणीमध्ये भाग घेणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- WFH in Corona : वर्क फ्रॉम होमचं हवं! 82 टक्के लोकांना ऑफिसला परतायची इच्छा नाही, अभ्यासात उघड
- जगभर प्रवास करा आणि काम करा; 'या' कंपनीची कर्मचाऱ्यांना 170 देशातून काम करण्यास मुभा
- Survey: ऑफिस सुरु, मात्र 26% कर्मचारी अजूनही गावीच, 81% लोक प्रवासामुळे ऑफिसला जाण्यास वैतागले
- आता वर्क फ्रॉम ऑफिस 12 तास, चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी, कामगार संहितेचे नवे नियम लागू