मुंबई : गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या गोदरेज अँड बॉयसने घर आणि संस्थात्मक विभागांमध्ये भारतातील अग्रगण्य फर्निचर सोल्यूशन ब्रँड असलेली आपली व्यवसाय शाखा गोदरेज इंटेरिओने 'घर, कार्यालय आणि त्यापलीकडे' या विषयावरील विशेष अभ्यासाचे निष्कर्ष प्रकाशित केल्याचे जाहीर केले आहे. साथीच्या रोगानंतरच्या जगात कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी गोदरेज इंटेरिओच्या वर्कस्पेस अँड एर्गोनॉमिक्स रिसर्च सेलने देशव्यापी अभ्यास केला आणि कर्मचाऱ्यांची कामावर परतण्याची चिंता, ऑफिस स्पेसच्या पारंपरिक वापरात झालेले बदल आणि घरातून आणि कार्यालयातून काम करण्याविषयीची मते यासारख्या विविध पैलूंचा खुलासा केला. 21 ते 56 वर्षे वयोगटातील एकूण 350 कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी संशोधनात भाग घेतला. त्यापैकी बहुतेकजण बहुराष्ट्रीय कंपन्या आणि भारतीय कॉर्पोरेटसाठी काम करत आहेत. 


संशोधन अभ्यासानुसार, गेल्या दोन वर्षांमध्ये मालक कंपन्या आणि कर्मचार्‍यांसाठी आरोग्य, तब्येत हे सर्वाधिक लक्ष देण्याचे क्षेत्र बनले होते आणि 31 टक्के कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे की मालकांना कर्मचार्‍यांच्या आरोग्याची काळजी असायलाच हवी. त्याचप्रमाणे, त्याच कालावधीत कर्मचार्‍यांनाही त्यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्या टीमच्या स्वास्थ्यात फरक दिसून आला. त्यामध्ये 62 टक्के जणांना वैयक्तिक स्वास्थ्यात आणि 50 टक्के जणांना टीमच्या स्वास्थ्यात सुधारणा दिसून आली.  


कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत आणण्याचे मार्ग शोधत असताना संशोधनातून असे दिसून आले आहे की, कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत येण्याबाबत चिंता आहेत. अनेक कार्यालयांमधील ओपन प्लॅन लेआऊट डिझाईन लक्षात घेता आरोग्य आणि सुरक्षिततेची चिंता या अभ्यासात उघड झाली. अभ्यासानुसार कार्यालयात परत येण्याबाबत कर्मचार्‍यांच्या मुख्य चिंता म्हणजे 90 टक्के कार्यालयात कोविड19 चा संसर्ग होतो, 86 टक्के लोकांना सध्याच्या जीवनशैलीशी तडजोड करावी लागेल असे वाटते, 84 टक्के कर्मचाऱ्यांना काम आणि आयुष्य यांच्यामधील समतोल बिघडण्याची भीती वाटते. 81 टक्के कर्मचाऱ्यांना लांब प्रवास करावा लागणार याची चिंता वाटते तर 71 टक्के जणांना पालक आणि मुलांची काळजी कशी घेणार हा प्रश्न सतावतो. तथापि, या सर्व चिंता असूनही, अभ्यास असेही सूचित करतो की 68 टक्के कर्मचारी आरामात आहेत आणि कार्यालयात परत येण्यास उत्सुक आहेत.


काही अंशी लॉकडाऊन शिथिल झालेल्या टप्प्यात, अभ्यासातून असे दिसून आले आहे की 26 टक्के कर्मचारी अजूनही त्यांच्या गावी आहेत आणि त्यांची कार्यालये असलेल्या शहरांपासून दूर आहेत तर 18 टक्के कर्मचारी त्यांची कार्यालये असलेल्या शहरांमध्ये परतले आहेत.


गोदरेज इंटेरिओच्या विपणन (बी टू बी) विभागाचे सहयोगी उपाध्यक्ष समीर जोशी म्हणाले, "कार्यालये सर्व कर्मचार्‍यांचे कार्यालयात स्वागत करण्यासाठी सज्ज होत असताना काम आणि आयुष्य यांच्यात चांगला समतोल राखण्याबद्दलच्या कर्मचार्‍यांच्या धारणा लक्षणीय बदलल्या आहेत. घरातून कामाचे फायदे पाहिल्यानंतरही औपचारिक कामाच्या ठिकाणाची संकल्पना पूर्णपणे नाहीशी झालेली नाही. तथापि, साथीच्या रोगाने ऑफिस स्पेसचा वापर अधिक प्रभावीपणे कसा करता येईल याविषयी चर्चा सुरु केली आहे. गोदरेज इंटरिओमध्ये आमच्याकडे ऑफिस स्पेसमध्ये अधिक सहयोगी फर्निचरची मागणी वाढताना पाहत आहोत आणि या आर्थिक वर्षात या विभागात 25 टक्क्यांची वाढ होईल. 


कार्यालयात परत येण्याचा कोणताही प्रकार यशस्वी होण्यासाठी, मालकांनी त्यांच्या कर्मचार्‍यांच्या चिंतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक स्वास्थ्याच्या बाबी धोरणे, कार्यालयाच्या पायाभूत सुविधा आणि डिझाईनमध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, भविष्यातील कामाच्या ठिकाणी सार्वजनिक आरोग्याच्या गरजांची पूर्तता, कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक गरजांची पूर्तता आणि त्यांच्या परिसंस्थेशी संलग्न होण्याच्या अनुकूल मार्गांद्वारे व्यवसायांसाठी आर्थिक मूल्य प्रदान करण्यासाठीचा दृष्टीकोन या तीन मुख्य गोष्टी पुरवल्या गेल्या पाहिजेत."


महामारीच्या वर्षांमध्ये मिळालेल्या अनुभवांवरुन भविष्यात कामकाजात कोणतेही मोठे व्यत्यय येणार नाहीत याची खात्री करण्यासाठी कंपन्या त्यांच्या धोरणांचे पुनर्मूल्यांकन करत आहेत. साथीच्या आजाराच्या सुरुवातीच्या दिवसांत विलिस टॉवर्स वॉटसन इंडिया कोविड-19 रेडिनेस पल्स सर्वेक्षण करण्यात आले. त्यात असे आढळून आले की भारतातील 83 टक्के कंपन्यानी त्यांच्या घरातून काम करण्याच्या धोरणाचे पुनरावलोकन करायचे ठरवले होते. यातून कार्यालयापासून दूर असल्यास कर्मचारी फारसे उत्पादनक्षम राहत नाहीत या पारंपरिक समजुतीला मोठाच धक्का बसला आहे असे सोसायटी फॉर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या (SHRM)अहवालात म्हटले आहे. गोदरेज इंटेरिओच्या अभ्यासानुसार 20 टक्के कर्मचारी पूर्ण वेळ दूरच्या ठिकाणाहून काम करण्याला पसंती देणारे, 23 टक्के कर्मचारी पूर्ण वेळ कार्यालयातून काम करायला पसंती देणारे तर 6 टक्के कर्मचारी जागेच्या बाबतीत फारसे आग्रही नसणारे आहेत.