एक्स्प्लोर

अमेरिकेत जाणं अधिक अवघड, एच-1 बी व्हिसाचे बदल अजून कडक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या धोरणानुसार एच-1 बी व्हिसासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अधिक अवघड होणार आहे.

वॉशिंग्टन : व्यवसाय किंवा नोकरीनिमित्त अमेरिकेत जाणं आता अधिक अवघड होणार आहे. कारण, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या धोरणानुसार एच-1 बी व्हिसासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अधिक अवघड होणार आहे. ट्रम्प प्रशासनानं एच-1 बी व्हिसामधील बदल गुरुवारी जाहीर केले. सात पानी धोरणातील अमेरिकेच्या सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस (यूएससीआयएस) अंतर्गत एच-1 बी व्हिसा दिला जातो. यामध्ये कंपन्याना आता अधिक कडक निकषांना सामोरं जावं लागणार आहे. आता अमेरिकेत नेमक्या दिवसांपुरताच व्हिसा दिला जाईल. यापूर्वी एका वेळी 3 वर्षांसाठी एच-1 बी व्हिसा दिला जात होता. मात्र, आता त्यापेक्षा कमी दिवसांसाठीही हा व्हिसा दिला जाईल. त्यामुळं आता कामाशिवाय अमेरिकेत राहणं अवघड झालं आहे. ट्रम्प प्रशासनाचा हा निर्णय 1 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आर्थिक वर्षापासून लागू होण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक फटका भारतातल्या आयटी कंपन्या आणि या कंपन्यांमार्फत परदेशात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसणार आहे. कारण, अमेरिकेत स्थायिक झालेल्या 70 टक्के भारतीयांकडे एच-1 बी व्हिसा आहे. विशेष म्हणेज, या निर्णयाचा फटका ग्रीन कार्डसाठी अर्ज करणाऱ्यांनाही बसण्याची शक्यता आहे. कारण, ज्या नोकरदारांकडे एच-1 बी व्हिसा आहे. आणि त्यांनी ग्रीन कार्डसाठी अर्ज केला आहे. त्यांच्या अर्जाला वेळेच मंजुरी न मिळाल्यास, त्यांना पुन्हा मायदेशी परतावे लागणार आहे. दरम्यान, एच-1 बी व्हिसावरुन गेल्या वर्षभरापासून ट्रम्प प्रशासन गंभीर होतं. गेल्या वर्षी लॉटरी पद्धतीने एच-1बी व्हिसा देताना अतिरिक्त व्हिसा घेतल्याचा ठपका अमेरिकेने आयटी कंपन्यांवर ठेवला होता. यावरुन टीसीएस, इन्फोसिस, कॉग्निझन्ट आदी कंपनींच्या कृतीवर अमेरिकेनं नाराजी व्यक्त केली होती. लॉटरी पद्धतीत त्यांचेच सर्वाधिक अर्ज मंजूर होतील या अपेक्षेने टीसीएस, इन्फोसिस, कॉग्निझन्ट यांसारख्या कंपन्या त्यांच्या गरजेपेक्षा कितीतरी अधिक अर्ज एच 1-बी व्हिसासाठी करवून घेतात, असा अरोप व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Embed widget