(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Israel: शत्रूच्या मिसाईलपासून संरक्षणासाठी इस्त्रायलच्या 'लेजर भिंती'चे कवच; जाणून घ्या सविस्तर
इस्त्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी सांगितलं की एका वर्षाच्या आतमध्ये इस्त्रायलच्या चारही बाजूने लेजर भिंतीचे आवरण लावण्यात येणार आहे.
जेरुसलेम: इस्त्रायलच्या सुरक्षेमध्ये आता आणखी वाढ होणार असून चारही बाजूने लेजर भिंत लावण्यात येणार आहे. पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी त्या संबंधी माहिती दिली आहे. त्यामुळे शत्रूच्या रॉकेट हल्ल्यांपासून देशाची सुरक्षा होणार आहे.
पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी मंगळवारी एका सुरक्षा परिषदेला संबोधित करताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, इस्त्रायलच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यासाठी आपण एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. शत्रूंच्या रॉकेट हल्ल्यापासून इस्त्रायलला असलेला धोका लक्षात घेता त्यावर उपाय म्हणून देशाच्या चारही बाजूने लेजर वॉलचे कवच लावण्यात येणार आहे. दक्षिण इस्त्रायलमध्ये एका वर्षाच्या आत या गोष्टीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
त्या आधी शत्रूच्या मिसाईलपासून सुरक्षा करण्यासाठी इस्त्रायलने आयर्न डोम डिफेन्स सिस्टिमचा वापर करायला सुरुवात केली आहे.
लेजर वॉल टेक्नॉलॉजी काय आहे?
इस्त्रायलकडून वापर करण्यात येणाऱ्या लेजर वॉल टेक्नॉलॉजी संबंधी अद्याप संपूर्ण माहिती समोर आली नाही. पण या टेक्नॉलॉजीचा वापर हा जमीन, हवा आणि आकाशामध्ये करता येणार आहे. त्यामुळे इस्त्रायलचे शत्रू राष्ट्र असलेल्या इराण आणि इतर दहशतवादी संघटनांना हा एक संदेश असल्याचं सांगण्यात येतंय.
इस्त्रायलच्या या टेक्नॉलॉजीमध्ये आयर्न डोम टेक्नॉलॉजी आणि इतर काही तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे लेजर वॉलच्या माध्यमातून आता इस्त्रायलची सुरक्षा अधिक चांगली आणि अत्याधुनिक होणार आहे.
इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन वादामुळे पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इराण पुरस्कृत दहशतवादी गटांपासून इस्त्रायलला नेहमी धोका असतो.
महत्त्वाच्या बातम्या:
- Omicron Variant : ओमायक्रॉनचा जगभरात कहर, गेल्या 10 आठवड्यांमध्ये 9 कोटींहून अधिक रुग्ण, WHOची माहिती
- Brazil Sao Paulo : खोदकामा दरम्यान दुर्घटना अन् मेट्रोच्या बोगद्यात पूर; बघता-बघता एक्स्प्रेसवे मेट्रो टनलवरच कोसळला
- मुलांना जन्म द्या अन् अकरा लाखांच्या बोनससह एका वर्षाची सुट्टी मिळवा! 'या' कंपनीचा मोठा निर्णय
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha