Bangkok School Bus Fire : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये एक भीषण अपघात झाला असून त्यामध्ये 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. स्कूल बसचे टायर फुटल्याने त्या बसला आग लागली आणि त्यामध्ये 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला. बसने पेट घेतल्यानंतर काहीजणांना आगीतून बाहेर काढण्यात आलं, मात्र त्यांना वेळेवर मदत मिळाली नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. मृतांच्या आकड्यात आणखी वाढ होऊ शकते.
बँकॉकमधील एका शाळेच्या बसमधून विद्यार्थी, शिक्षक असे 44 प्रवासी प्रवास करत होते. हे सर्वजण सहलीसाठी जात होते. त्याचवेळी बँकाकमधील पाथूम थानी प्रांतात या बसचे टायर फुटला आणि अचानक बसने पेट घेतली. त्यामध्ये 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
ही आग एवढी भीषण होती की काही वेळातच त्याने संपूर्ण बसला कवेत घेतले. त्यामुळे अनेक मुले बसमध्ये अडकून जिवंत जाळली गेली. काही जळालेल्या मुलांना बाहेर काढण्यात यश आले, मात्र त्यांना रुग्णवाहिका मिळाली नाही. यामुळे ते मदतीसाठी इकडे-तिकडे भटकत राहिल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बाधित कुटुंबांना सरकार भरपाई देणार
थायलंडचे पंतप्रधान पटोंगटार्न शिनावात्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले की, सरकार उपचाराचा खर्च उचलेल आणि पीडितांच्या कुटुंबीयांना भरपाई देईल.
या अपघाताचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून सर्वत्र फक्त धूर दिसत असल्याचे दिसून येत आहे. मुलांची नावं, वय आणि इतर माहिती अद्याप समोर आलेली नाही. बस इतकी तापली होती की बराच वेळ त्यातून मुलांचे मृतदेह बाहेर काढता आले नाहीत.
ही बातमी वाचा :