Superpowers In 2050 नवी दिल्ली : आपण जर सध्याचा जगाचा विचार केला तर सुपरपॉवर देशांच्या यादीत कोणते देश असू शकतात? आपल्या डोक्यात अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, जर्मनी सारख्या देशांची नावं येतात. भारताच्या प्रगतीचा विचार केला असता जागतिक पातळीवर आपल्या देशाचं स्थान देखील भक्कम होत आहे. ज्या प्रकारे जगभरातील देशांमध्ये आर्थिक बदल आणि राजकारणातील बदल होत आहेत ते पाहता 2050 मध्ये कोणते देश सुपरपॉवर असतील हे सांगणं अवघड आहे. मात्र, ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी एा कार्यक्रमात याबाबत वक्तव्य केलं आहे. ब्लेअर म्हणाले की 2050 मध्ये जगात केवळ महासत्ता असतील. त्यामध्ये अमेरिका चीन आणि त्यानंतर भारताचा समावेश असेल.
अमेरिकन थिंक टँक मिल्केन इन्स्टिट्यूटच्या वार्षिक कार्यक्रमात टोनी ब्लेअर बोलत होते. अमेरिका, चीन आणि भारत या तीन देशांसोबत इतर देशांना चांगले संबंध ठेवायला लागणार आहेत. आगामी काळात हे तीन देश सर्व गोष्टी ठरवणार आहेत, असं ब्लेअर म्हणाले.
भारताबद्दल बोलताना टोनी ब्लेअर म्हणाले की वर्ल्ड इकोनॉमी फोरम, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार या दशकाच्या शेवटपर्यंत भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनेल. भारत गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक क्षेत्रात तेजी पाहायला मिळत आहे. अवकाश विज्ञान, संरक्षण, अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात भारत चांगली कामगिरी करत आहे. जगातील अनेक संस्थांनी भारताचं वर्चस्व मान्य केलं आहे. याशिवाय भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध चांगले असल्याचं देखील टोनी ब्लेअर म्हणाले.
अमेरिका आणि चीन यांच्यात संघर्ष
टोनी ब्लेअर यांनी सुपरपॉवर देशांबाबत बोलताना म्हटलं की भारताच्या पुढं फक्त अमेरिका आणि चीन असेल. अमेरिका आणि चीन हे दोन्ही देश एकमेकांना कमी दाखवण्याची एकही संधी सोडत नाहीत. दोन्ही देशांमधील संघर्ष टोकाला पोहोचलेला आहे. आर्थिक आणि औद्योगिक धोरणावरुन देखील दोन्ही देशांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळं अमेरिकेनं चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर कर आकारला आहे. सेमीकंडक्ट तंत्रज्ञान चीनमध्ये जाऊ नये यासाठी अमेरिकेनं प्रयत्न केले होते.
टोनी ब्लेअर यांनी वेस्ट पॉलिसीच्या मुद्यावरुन अमेरिकेवर हल्लाबोल केला. अमेरिकेच्या वेस्ट पॉलिसीत डचणी आहेत. अफगाणिस्तानातून अमेरिका बाहेर पडल्यावर तिथं काय झालं ते पाहा असं ब्लेअर म्हणाले.
इतर बातम्या :