Elon Musk Social Media App: सोशल मीडिया प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच त्यांना एक नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मिळू शकतं. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला कंपनीचे सीईओ एलॉन मस्क हे एक नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करण्याचा विचार करत आहेत. यासंदर्भात त्यांनी शनिवारी ट्विट करत माहिती दिली आहे.
एका वापरकर्त्याने विचारला होता प्रश्न
ट्विटरवरील एका वापरकर्त्याने एलॉन मस्क यांना विचारले होते की, जिथे लोकांना बोलण्याचं आणि लेखन स्वातंत्र्य असेल, जिथे जाहिराती कमी असतील, असा एक वेगळा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करण्याचा तुम्ही विचार कराल का? यावर मस्क यांनी उत्तर दिले की, ट्विटर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या तत्त्वांचे पालन करण्यात अयशस्वी ठरत आहे आणि लोकशाहीला कमजोर करत आहे.
या ट्विटच्या एक दिवस आधी एलॉन मस्क यांनी ट्विटर पोल केला होता, ज्यामध्ये त्यांनी विचारले होते की, ट्वीटर भाषण स्वातंत्र्याच्या तत्त्वाचे पालन करते का? या पोलमध्ये 70% पेक्षा जास्त लोकांनी 'नाही' म्हणून उत्तर दिले होते. पोलदरम्यान ते म्हणाले की कृपया काळजीपूर्वक मतदान करा, कारण या पोलचे निकाल महत्त्वाचे असतील.
दरम्यान, ज्या प्रकारे मस्क हे ट्वीट करत पोल घेत आहे, त्यावरून ते नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करण्याचा विचार करत असल्याचं बोललं जात आहे. मस्कचे हे प्लॅटफॉर्म ट्वीटर, फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला चांगलंच आव्हान निर्माण करू शकतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Russia Ukraine War : युद्धादरम्यान जर्मनीकडून युक्रेनच्या पाठीशी, 100 मशीन गन आणि 1,500 क्षेपणास्त्रे युक्रेनमध्ये दाखल
- Russia Ukraine War : लाखो डॉलर्स घेऊन पळून जात होती युक्रेनच्या माजी खासदाराची पत्नी, सुटकेससह हंगेरियन सीमेवर सैनिकांनी पकडले
- China Plane Crash : चीन विमान अपघातात 132 प्रवाशांचे मृतदेह सापडले, सापडलेल्या दोन्ही ब्लॅक बॉक्सवरून तपास सुरु