Afghanistan Taliban Ban Beauty Salon : अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबान (Taliban) सत्तेत आल्यापासून महिलांवर कडक निर्बंध लावले जात आहेत. तालिबानने आता ब्युटी पार्लरवर बंदी घातली आहे. तालिबान सरकारने आता महिलांचा सजण्याचा अधिकारही हिरावून घेतला आहे. देशातील सर्व ब्युटी पार्लरवर बंदी घालण्यात आली असून त्यांना पार्लर बंद करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. 


अफगाणिस्तानमध्ये ब्युटी पार्लरवर बंदी


तालिबानने मंगळवारी नवा आदेश जारी करत अफगाणिस्तानमधील सर्व ब्युटी पार्लर बंद करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आता अफगाणिस्तानमधील सर्व ब्युटी सलून आता एका महिन्याच्या आतमध्ये बंद करावं लागणार आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानने 25 जुलै रोजी जाहीर केलं की, देशातील सर्व ब्युटी पार्लर एका महिन्याच्या मुदतीत बंद करण्यात येतील.  


तालिबानचा महिलांवर जाच सुरुच


तालिबानने अफगाणी महिलांचं जगणं कठीण केलं आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सत्ता आल्यापासून महिलांवर विविध कठोर नियम लादण्यात आले आहेत. आधी स्त्रिया आणि मुलींच्या शिक्षणाचा अधिकार तालिबानने हेरावून घेतला. महिलांच्या शिक्षणावर बंदी घातल्यानंतर महिलांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर महिलांच्या नोकरीवर बंदी घालण्याचा आदेश जारी करत त्यांच्या हक्क आणि स्वातंत्र्य हेरावून घेतलं. आता तालिबानने महिलांचा सजण्याचा अधिकारही हेरावून घेतला आहे.






तालिबानने महिलांना लादलेले निर्बंध


तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून महिलांना सार्वजनिक ठिकाणी तोंड झाकण्याचे आदेश देण्यात आले. महिलांना पार्क आणि जिम यासारख्या सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी घातली. महिलांच्या शिक्षणावर बंदी घातली. अफगाणिस्तानमध्ये पुरुष नातेवाईकाशिवाय लांब पल्ल्याचा प्रवास करण्यास देखील बंदी आहे. याव्यतिरिक्त, अफगाणिस्तानमधील महिलांना पुरुष नातेवाईकाशिवाय विमानाने प्रवास करण्यास मनाई आहे. आता ब्युटी पार्लरमध्ये जाण्यासही बंदी घातली आहे.


तालिबानी सरकारच्या निर्णयाचा जगभरातून निषेध


ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानात मोठा उलटफेर झाला आणि तालिबानी सरकार सत्तेत आलं आहे. सत्तेत येताच तालिबान्यांनी आपल्या जुन्या कायद्यांची अंमलबजावणी सुरु केली. सर्वात महिलांना आणि विद्यार्थिनींना टार्गेट केलं आहे. महिलांवर एकापोठापाठ एक निर्बंध आणले आहेत. तालिबानी सरकारच्या निर्णयाचा जगभरातून निषेध करण्यात आला. अमेरिकेसह अनेक देशांकडून यावर प्रतिक्रियाही आली आहे. येथील महिलांनी अनेक देशांकडे मदतीसाठी विनंती देखील केली आहे. कोणता देश यासाठी पुढाकार घेणार आणि येथील परिस्थिती कधी बदलणार याकडे येथील महिला डोळे लावून आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Afghanistan : तालिबान सरकारचा महिलांवर जाच, शिक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींना चाबकाचे फटके