Taliban Decree: अफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यापासून तालिबान्यांनी (Taliban Afganistan) तिथल्या लोकांचं जगणं मुश्लिक केले आहे. अगोदर  महिलांना बुरख्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी प्रवेश बंदी, त्यानंतर रात्री एकट्या महिलेला फिरण्यास मनाई केली आहे. आता तर हद्दच झाली मुलींच्या शिक्षणावरच तालिबान्यांनी बंदी आणली आहे. 


ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानात मोठा उलटफेर झाला आणि तालिबानी सरकार सत्तेत आलं आहे. सत्तेत येताच तालिबान्यांनी आपल्या जुन्या कायद्यांची अंमलबजावणी सुरु केली.  सर्वात महिलांना आणि विद्यार्थिनींना टार्गेट केलं आहे. महिलांवर एकापोठापाठ एक असे निर्बंध आणले आहेत.  त्यांच्या एकटं फिरण्यावर ब्रेक लावला त्यानंतर त्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या  संस्थांना बंद केलं.  त्यानंतर तालिबानी सरकरानं महाविद्यालयांमध्ये मुलींच्या शिक्षणावर निर्बंध आणले आहेत. त्याविरोधात देशव्यापी आंदोलनं देखील झाली अनेक देशांमध्ये तालिबानी निर्णयाचा निषेध केला. पण त्याचा फार फायदा झाला नाही. उलट तालिबान्यांनी त्यांच्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांवर गोळीबार केला.  आता यामध्ये आणखी दोन मोठ्या गोष्टींची भर पडली आहे.  एक म्हणजे मुलींच्या उच्च माध्यमिक शिक्षणावर बंदी घातली  फक्त सरकारी विद्यापीठातच नाही. तर खासगी विद्यापिठातही मुलींच्या शिक्षणावर निर्बंध आणले त्याचा विरोध सुरु झाला. विद्यापिठांसमोर विद्यार्थिनींना आंदोलनं सुरु केली.  तर त्यांनाच तालिबान्यांनी मारपीट केली. आंदोलन चिरडून टाण्यासाठी गोळीबारही केली. काही जणांना अटकही केली. 


ऑगस्ट 2021 ला तालिबानी सत्तेत आल्यापासून काय झालं? 



  • हजारो मुलींचं माध्यमिक शिक्षण बंद झाले

  • महिलांना सरकारी नोकऱ्यांमधून काढले

  • महिलांना बुरख्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी प्रवेश बंदी

  • रात्री एकट्या महिलेला फिरण्यास मनाई

  • 160 माध्यमांना बंद करण्यात आले

  • 100 पेक्षा जास्त रेडिओ स्टेशन बंद केले

  • तालिबानविरोधी रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकारांची हत्या केली

  • महिलांना पार्क, जिम आणि स्विमिंग पूल या ठिकाणीही बंदी घातली


या निर्णयामुळे देशात आधीच दहशत असताना तालिबान्यांनी आणखी एक निर्णय घेतला आहे.  तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटनांसाठी काम करणाऱ्या महिलांना कामाकरुन कमी करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी त्यांना नोटिफिकेशन काढलंय.  त्यामुळे आता ना शिक्षण...ना नोकरी..ना स्वातंत्र्य... ही अवस्था येथील  महिलांची झाली आहे.  


तालिबान्यांच्या या निर्णयानंतर हॅशटॅश लेट हर लर्न... ग्लोबली ट्रेण्ड होऊ लागला आहे.  अमेरिकेसह अनेक देशांकडून यावर प्रतिक्रियाही आली आहे.  येथील महिलांनी अनेक देशांकडे मदतीसाठी विनंती देखील केली आहे.  कोणता देश यासाठी पुढाकार घेणार याकडेही अवघ्या जगाचं लागले आहे.