Syria Drone Attack: सीरियामध्ये अमेरिकेचा पुन्हा हवाई हल्ला, अल कायदाचा मोस्ट वॉन्टेड अब्दुल हामिद मारला गेल्याचा दावा
US Killed Top Al-Qaeda Leader in Syria: सीरियातील दहशतवादी तळांवर अमेरिकेने काल पुन्हा हवाई हल्ला केला आहे. यात अल कायदाचा वरिष्ठ नेता अब्दुल हामिद अल-मातर (Abdul Hamid al-Matar) मारला गेला आहे.
US Killed Top Al-Qaeda Leader in Syria: सीरियातील दहशतवादी तळांवर अमेरिकेने काल पुन्हा हवाई हल्ला केला आहे. सेंट्रल कमांड (CENTCOM) चे प्रवक्ते मेजर जॉन रिग्सबी (John Rigsbee) यांनी शुक्रवारी सांगितलं की, उत्तर पश्चिमी सीरियामध्ये अमेरिकन सैन्यानं केलेल्या हवाई हल्ल्यात (Air Strike) अल कायदाचा वरिष्ठ नेता अब्दुल हामिद अल-मातर (Abdul Hamid al-Matar) मारला गेला आहे. रिग्सबी यांनी सांगितलं की, अमेरिकेनं या हवाई हल्ल्यासाठी एमक्यू-9 विमानाचा वापर केला. या हल्ल्यात कुठल्याही नागरिकाचा मृत्यू झाला नसल्याचीही माहिती आहे.
रिग्सबी यांनी सांगितलं आहे की, अमेरिका आणि मित्र राष्ट्रांसाठी अल कायदाकडून नेहमीच धोका होत राहिला आहे. दहशतवादी संघटना सीरियाचा सुरक्षित आश्रयस्थान म्हणून वापर करते आणि येथून दहशतवादी कारवायांची योजना आखते. रिग्सबींनी सांगितलं की, अल-कायदाच्या या नेत्याची हत्या दहशतवादी संघटनेच्या जागतिक हल्ल्यांच्या योजनांवर मोठा परिणाम करेल, आता अमेरिकन नागरिक, आमचे मित्रराष्ट्र आणि निष्पाप लोकांचा छळ आणि हल्ले थांबतील अशी आशा आहे, असं त्यांनी सांगितलं.
वरिष्ठ नेता ठार झाल्यानं अल कायदाच्या योजनांवर पाणी
अल-कायदाच्या या नेत्याची हत्या दहशतवादी संघटनेच्या जागतिक हल्ल्यांच्या योजनांवर मोठा परिणाम करेल, आता अमेरिकन नागरिक, आमचे मित्रराष्ट्र आणि निष्पाप लोकांचा छळ आणि हल्ले थांबतील अशी आशा आहे, असं रिग्सबी यांनी सांगितलं. अमेरिका यापुढे देखील अमेरिकी भूमीला नुकसान पोहोचवणाचं षढयंत्र रचणाऱ्या अल कायदा आणि इतर दहशतवादी संघटना आणि त्याच्या सदस्यांना असंच प्रत्युत्तर देईल, असंही सांगण्यात आलं आहे.
20 सप्टेंबर रोजीही केला होता हल्ला
याआधीही 20 सप्टेंबर रोजी अमेरिकेनं सीरियाच्या इदलिब शहरामध्ये एक हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात अलकायदा नेता सलीम अबू-अहमद (Salim Abu-Ahmad) मारला गेला होता. सलीम अल कायदामध्ये प्लान बनवणे आणि फंडिंगचा वापर करण्याचं काम करायचा. त्याआधी दक्षिण सीरियात अमेरिकेच्या चौकीवर हल्ला झाला होता.