Air Travel: जगभरातील विविध भागांमध्ये क्लिअर-एअर टर्ब्युलन्सचे (Clear Air Turbulence) प्रमाण वाढले आहे, ज्यात हवा धुरकट होते आणि हे विमानासाठी धोकादायक असते, असं ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगच्या संशोधकांना आढळून आलं आहे. हवा अशांत झाल्याने किंवा धुरकट झाल्याने विमान चालवणे अवघड, समोरचा मार्ग नीट दिसत असल्याने विमान चालक सावकाश विमान चालवतात आणि विमान प्रवासासाठीचा वेळ वाढतो. हवामानात झालेल्या बदलांमुळे हवेवर परिणाम होतो आणि विमान प्रवासावर देखील त्याचा परिणाम दिसून येतो.


उत्तर अटलांटिकाच्या एका विशिष्ट बिंदूवर जगातील सर्वात व्यस्त उड्डाण मार्गांपैकी एक मार्ग आहे. हवेच्या गंभीर अशांततेचा हा पट्टा असून या मार्गावरील प्रवास हवामान बदलांमुळे वाढला आहे. 1979 साली या पट्ट्यातून प्रवास करण्यासाठी 17.7 तासांचा अवधी लागायचा. मात्र, आता हाच टप्पा पार करण्यासाठी 27.4 तास लागतात. याचाच अर्थ, हा प्रवास चार दशकांपूर्वीच्या तुलनेत 55 टक्क्यांनी वाढला आहे. 2020 मध्ये 70 ते 96.1 तासांपर्यंत मध्यम अशांतता 37 टक्क्यांनी वाढली आणि हलकी अशांतता 466.5 ते 546.8 तासांपर्यंत 17 टक्क्यांनी वाढली, असे संशोधकांनी सांगितले. जिओफिजिकल रिसर्च लेटर्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात हा निष्कर्ष आढळून आला. 


हवेच्या अशांततेतील (Air Turbulence) वाढ ही हवामान बदलाच्या परिणामांशी संबंधित असल्याचे अभ्यासातून समोर आले. कार्बन डायऑक्साईड (CO2) उत्सर्जनातील उबदार हवा जेट प्रवाहांमध्ये विंडशीअर वाढवत आहे, उत्तर अटलांटिक आणि जागतिक स्तरावर हवेतील अशांतता वाढवत आहे. हवेतील अशांततेमुळे उड्डाणांची अडचण होते आणि ते कधीकधी धोकादायक देखील ठरू शकते.


युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगमधील पीएचडी संशोधक मार्क प्रोसर यांनी सांगितलं की, एअरलाइन्सने वाढलेल्या अशांततेचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल विचार करणे आवश्यक आहे, कारण एकट्या यूएसमध्ये यासाठी वार्षिक USD 150-500 दशलक्ष खर्च येतो. हवेच्या अशांततेतून प्रवास करताना घालवलेल्या प्रत्येक अतिरिक्त मिनिटामुळे विमानातील झीज वाढते, तसेच प्रवासी आणि विमान परिचरांना दुखापत होण्याचा धोका असतो, असे प्रोसर म्हणाले. यूएस आणि उत्तर अटलांटिकमध्ये सर्वाधिक वाढ झाली असताना, अभ्यासात असे आढळून आले की युरोप, मध्य पूर्व आणि दक्षिण अटलांटिकमधील इतर व्यस्त उड्डाण मार्गांवरही अशांततेत लक्षणीय वाढ झाली आहे.


वातावरणातील बदलामुळे भविष्यात स्वच्छ हवेतील अशांतता वाढेल हे दर्शवणाऱ्या संशोधनानंतर, हवेतील अस्थिरतेची वाढ आणखी सुरू झाली आहे, असे रीडिंग विद्यापीठातील वातावरणीय शास्त्रज्ञ प्रोफेसर पॉल विल्यम्स यांनी सांगितले. येत्या काही दशकांत अस्थिर आणि अशांत हवेला रोखण्यासाठी आणि उड्डाणांचा प्रवास सुरळीत होण्यासाठी सुधारित अशांतता अंदाज आणि शोध प्रणालीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे, असं देखील विल्यम्स पुढे म्हणाले.


हेही वाचा:


Dubai: दुबईत कोणत्या देशातील लोक जास्त राहतात? भारत की पाकिस्तान? पाहा...