Dubai: जगातील सर्वात लोकप्रिय शहरांपैकी एक असलेल्या दुबईचे नाव कोणी ऐकले नसेल, असे नाही. या शहराची शैली सर्वांना चांगलीच माहिती आहे. संयुक्त अरब अमिरातीची (UAE) राजधानी दुबई (Dubai) हे व्यवसाय आणि पर्यटनाचे प्रमुख केंद्र आहे. या शहराची लाईफस्टाईल सर्वांनाच आकर्षित करत आहे, यामुळेच जगातील विविध देशांतील लोक या शहरात स्थायिक होण्यासाठी येथे येतात. आकडेवारीनुसार, 200 हून अधिक देशांतील लोक दुबई शहरात येतात आणि तिथेच स्थायिक होऊन राहतात. भारत देशाचे आणि शेजारील देश पाकिस्तानचे लोकही दुबईत जाऊन राहतात. असं असताना, दुबईच्या वाढत्या लोकसंख्येमध्ये भारत आणि पाकिस्तानमधील किती लोकांचा समावेश आहे ते जाणून घेऊया.


यूएईच्या शहरांमध्ये स्थलांतरितांच्या संख्येत वाढ


दुबईची लोकसंख्या 2023 मध्ये खूप वाढल्याचे सांगितले जात आहे. भारत (India) आणि पाकिस्तानमधून (Pakistan) येथे राहण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. खरं तर, कोरोना संक्रमणापासून यूएई शहरांमध्ये स्थलांतरित होणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि येत्या काही वर्षांत त्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.


दिवसेंदिवस वाढतेय दुबईची लोकसंख्या


पाकिस्तानातील राजकीय अस्थिरतेमुळे दुबईत पाकिस्तानी नागरिकांची संख्या पूर्वीच्या तुलनेत वाढत असल्याचे मानले जाते. त्याचवेळी, कोरोनानंतर येथे भारतीयांची संख्याही वाढली आहे. अंदाजानुसार, यावर्षी UAE ची लोकसंख्या 10.17 दशलक्ष इतकी आहे. 2022 च्या तुलनेत त्यात 0.89 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मे 2023 पर्यंत दुबईची लोकसंख्या 3.57 दशलक्ष इतकी होती.


दुबईमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी किती?


Globalmediasite.com वेबसाइटनुसार, सध्या UAE मध्ये भारतीय NRI लोकांची संख्या 2.80 दशलक्ष आहे. तर पाकिस्तानींची संख्या 1.29 दशलक्ष आहे. याचा अर्थ या सुंदर शहरात भारतीयांची (Indians) संख्या पाकिस्तानी (Pakistani) लोकांपेक्षा जास्त आहे.अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेमुळे निर्माण झालेल्या आर्थिक समस्यांमुळे दुबई (Dubai) आणि लंडनसारख्या (London) शहरांमध्ये श्रीमंत पाकिस्तानी लोकांची संख्या वाढली आहे.


इतर देशांबद्दल बोलायचे झाल्यास, दुबईत बांगलादेशींची संख्या 0.75 दशलक्ष आहे, तर चीनमधील 0.22 दशलक्ष लोक येथे राहतात. दुबईला श्रीमंतांचे शहर म्हटले जाते आणि येथील राहणीमान अतिशय उच्च दर्जाचे आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे पैसे कमवण्यासाठी आणि ऐश-आराम करण्यासाठी येतात. 


हेही वाचा:


India: यंदाही दिल्लीला मागे टाकत मुंबई बनलं देशातील सर्वात महागडं शहर! सर्वेक्षणातून नेमकं काय आलं समोर? वाचा...