एक्स्प्लोर

Coronavirus | कोरोना हवेतून पसरत असल्याचे प्रबळ पुरावे, The Lancet चा अभ्यास

कोरोनाचा (Coronavirus) प्रसार हवेतून होत असल्याने त्याच्या प्रसारावर नियंत्रण ठेवता येत नसल्याचं मत सहा तज्ज्ञांच्या एका टीमने केला आहे.  The Lancet या सायन्स नियतकालिकेत हा अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

Coronavirus : कोरोना अर्थात  SARS-CoV-2 व्हायरस हा हवेतून पसरत असल्याचं प्रबळ पुराव्यातून सिद्ध झालं असल्याचं संशोधन द लॅन्सेट या सायन्स नियतकालिकेत प्रसिद्ध करण्यात आलं आहे. शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या संशोधनात सांगण्यात आलंय की कोरोना हवेतून परसतोय आणि त्याचे सातत्याने पुरावे संशोधकांना मिळत आहेत. 

ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडा या देशातील सहा तज्ज्ञांनी सांगितलंय की कोरोना हवेतून पसरत असल्यानेच जगभरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थांना त्याच्यावर अद्याप नियंत्रण ठेवता येणं शक्य झाले नाही. कोरोनाचा प्रसार हा हवेच्या माध्यमातून होतोय या दाव्यासाठी या संशोधानात दहा ओळींचे पुरावे देण्यात आले आहेत. 

या अहवालात असंही सांगण्यात आलंय की, बाहेरच्या वातावरणापेक्षा घरातील वा बंदिस्त वातावरणात कोरोनाचा प्रसार जास्त होतोय. पण घरी योग्य ती वेन्टिलेशन व्यवस्था असेल तर कमी धोका आहे. तसेच लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ही एकूण रुग्णांपैकी 40 टक्के असल्याचा दावाही यात करण्यात आला आहे. 

या आधीही काही वैज्ञानिकांनी दावा केला आहे की कोरोनाचा प्रसार हा प्रामुख्याने हवेच्या माध्यमातून होतोय. पण त्यांच्या हा दावा सिद्ध करण्यासाठी आवश्यक ते पुरावे नव्हते. 

गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात, 32 देशांच्या 200 पेक्षा अधिक वैज्ञानिकांनी जागतिक आरोग्य संघटनेला एक पत्र लिहलं होतं. त्यामध्ये सांगितलं होतं की, कोरोनाचा प्रसार हा हवेच्या माध्यमातून होतोय. डोळ्याला न दिसणाऱ्या कणांमुळे लोकांमध्ये कोरोनाचा प्रसार होतोय. 

द लॅन्सेन्ट या सायन्स नियतकालिकेत प्रसिध्द झालेल्या या अभ्यासावर आता जागतिक आरोग्य संघटनेने आणि जगभरातल्या देशांच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थांनी विचार करावा आणि हवेच्या माध्यमातून होणारा कोरोनाचा प्रसार कसा थांबवता येईल त्यावर उपाययोजना कराव्यात असं मत काही संशोधकांनी व्यक्त केलंय. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan : इम्रान खान यांना जेलमधून रुग्णालयात हलवणार; लष्कराने घेतला शिफा रुग्णालयाचा ताबा, पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी  
इम्रान खान यांना जेलमधून रुग्णालयात हलवणार; लष्कराने घेतला शिफा रुग्णालयाचा ताबा, पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी  
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget