Stampede in Yemen capital: रमजान (Ramadan 2023) उत्साहावर विरजण घालणारी बातमी येमेनमधून समोर येत आहे. येमेनची राजधानी साना येथे जकात वाटण्याच्या कार्यक्रमा चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 79 लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. साना येथील एका अधिकाऱ्याने दिलेल्य माहितीनुसार यमनमध्ये झलेल्या दुर्घटनेत 79 लोकांचा मृत्यू झाला असून 322 नागरिक जखमी झाले आहेत. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समवेश आहे .
हुथीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी एपीला दिलेल्या माहितीनुसार, यमनची राजधानी सानातील बाबा अल यमन जिल्ह्यात एका पैसे वाटपाच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाला. यामध्ये 79 लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो जखमी आहे. अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर एपी या वृत्तसंस्थेला मृत व्यक्तींचा आकडा सांगितला आहे. तसेच चेंगराचेंगरी संबंधित कोणतीही माहिती देण्यासा मनाई असल्याचे देखील सांगितले. पुढे ते म्हणाले, ही घटना एका शाळेमध्ये घडली असून शाळेत रमजानच्या पार्श्वभूमीवर जकात वाटपच सुरू होते. जकात घेण्यासाठी अनेक लोकांची गर्दी जमली होती.
या घटनेची माहिती मिळताच मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताचा नातेवाईकांनी या परिसरात गर्दी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण झाले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आळे आहे.
येमेनच्या मंत्रालयाने सबा समाचार एजन्सीला दिलेल्या माहितीनुसार, जखमी व्यक्तींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच जकात वाटप कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच अधिकाऱ्यांना घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. प्रशासनाने मृत आणि जखमी व्यक्तींबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काही बिझनेसमॅन लोकांनी पैसे वाटप करण्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमा दरम्यान गोंधळ उडाला. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जमिनीवर पडलेले मृतदेह दिसत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :