Nashik Kubeshwer Dham : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिहोर येथील कुबेश्वर धाम येथे रुद्राक्ष वाटप आणि शिवमहापुराण कथेपूर्वीच परिस्थिती अनियंत्रित झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मालेगाव येथील महिलेचा मृत्यू झाला, असून तर तीन महिला बेपत्ता झाल्या आहेत.
मध्य प्रदेशातील (Madhya pradesh) सिहोर जिल्ह्यातील कुबेश्वर धाम (Kubeshwer Dham Sihore) रुद्राक्ष वाटपाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान अचानक गर्दी वाढल्याने प्रशासनाचाही गोंधळ झाला. अशातच गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत महाराष्ट्रातील (Maharashtra) एका महिलेचा मृत्यू झाला आहे. रुद्राक्ष मिळण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. या गर्दीमध्येच मालेगावच्या (Malegaon) एका महिलेची अचानक प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला आहे. तर तीन महिला बेपत्ता झाल्या आहेत.
सिहोर जिल्हा मुख्यालयाजवळील चितवलिया हेमाच्या कुबेश्वर धाम येथे 16 फेब्रुवारीपासून सात दिवसीय रुद्राक्ष महोत्सव सुरू झाला आहे. कार्यक्रमापूर्वीच आठ लाखांहून अधिक भाविक सिहोरमध्ये पोहोचले. भाविकांच्या अतिरेकामुळे इंदूर-भोपाळ महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. महामार्गावर 20 किलोमीटरहून अधिक जाम असल्याचे सांगण्यात येत आहे. कथेपूर्वी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि अनेक मंत्री पंडित प्रदीप मिश्रा यांचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचत आहेत. मालेगाव येथील रहिवासी असलेल्या 50 वर्षीय मंगलाबाई या रुद्राक्ष खरेदीसाठी रांगेत उभ्या असताना अचानक आजारी पडल्या, असे सांगितले जात आहे. उन्हात रांगेत उभी असलेली ही महिला रुद्राक्ष घेण्यासाठी थांबली होती. उन्हामुळे महिलेला चक्कर आली आणि ती खाली पडली. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नजीकच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
गर्दी नियंत्रणासाठी अधिकची कुमक
दरम्यान मध्यमप्रदेशातील अतिशय महत्वाचा कार्यक्रम म्हणून याकडे पहिले जाते. त्यामुळे 18 फेब्रुवारीला माजी मुख्यमंत्री कमलनाथ देखील कार्यक्रमाला हजेरी लावणार होते. दरम्यान सद्यस्थितीत झालेल्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी कुबेश्वर धाम येथील बंदोबस्तासाठी पोलीस आणि प्रशासन पूर्ण तत्परतेने काम करत आहेत. याशिवाय अनेक समित्या, बजरंग दल, हिंदू उत्सव समितीचे कार्यकर्तेही कुबेश्वर धाम येथे बंदोबस्तात गुंतले आहेत. भाविकांची प्रचंड गर्दी पाहता पंडित प्रदीप मिश्रा यांनी बुधवारी धाममध्ये रुद्राक्ष वाटप सुरू केले होते.
नेपाळहून रुद्राक्ष आला...
विठ्ठलेश सेवा समितीचे मीडिया प्रभारी प्रियांशू दीक्षित यांनी सांगितले की, कुबेरेश्वर धाम येथील मंदिराच्या आवारात नेपाळहून आणलेल्या रुद्राक्षापासून भगवान शंकराचे सहा फूट उंच शिवलिंग बनवले आहे. ज्याचे पंडित प्रदीप मिश्रा यांच्यासह सहकारी सकाळी सातपासून पंडितांना प्रारंभ झाला असून नऊ वाजेपर्यंत दूध, पाणी आणि फळांच्या रसाने अभिषेक करण्यात आला. यानंतर दुपारी 1 ते 4 या वेळेत श्री महाशिवरात्री शिवमहापुराण कथेचा शुभारंभ झाला आहे. तसेच शिवमहापुराण कथा 16 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. आज मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे देखील कथास्थळी पोहोचले आहेत.