Solar Storm : मागील काही काळात तौक्ते, निसर्ग अशा विविधप्रकारच्या वादळांनी (Storms) भारतात हजेरी लावली. जगाच्या विविध भागात विविध प्रकारची वादळं सतत येत असतात. कधी पाऊस आणि वादळ, कधी रेतीचं वादळ अशी अनेक वादळं आपण पाहिली आहेत. त्यात आता सौरवादळ असा एक नवा वादळाचा प्रकार समोर येत आहे. नासाने या सौरवादळाबाबत (Solar Storms) नुकतीच माहिती दिली.


सूर्य हा एक चुंबकीय परिवर्तनीय तारा आहे. त्यामुळे सूर्याच्या पृष्ठभागावरून विद्युत चुंबकीय उद्रेक होतात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचे काही कण म्हणजेच चुंबकीय उर्जा उत्सर्जित होऊन ती सूर्याचं चुंबकीय क्षेत्र ओलांडून सौरमालिकेत सगळीकडे पसरु शकते. या उत्सर्जित किरणांचा स्फोट म्हणजेच सौरवादळ. सौर ज्वाला, उच्च-गती सौर वारा, आणि सौर ऊर्जा कण या साऱ्या सूर्याशी संबधित क्रियांमागे सूर्याचे चुंबकीय क्षेत्रच जबाबदार असते.


सौर वादळाचा पृथ्वीवर परिणाण?


सौर वादळ नेमकं किती क्षमतेचं आहे, यावर त्याची तीव्रता कळते. सौरवादळामुळे सर्वात मोठा बदल वातावरणात होऊ शकतो. वातावरण कमालीचं गरम होऊन सॅटलाईट सिग्नलवरही याचा मोठा परिणाम होऊ शकतो. पृ्थ्वीजवळील आवरण सौरवादळापासून पृथ्वीचं काही प्रमाणात संरक्षण करु शकतं. मात्र अंतराळातील विविध वस्तू उदाहरणार्थ सॅटलाईट अशा गोष्टींवर मात्र याचा मोठा परिणाम होऊ शकतो. यामुळे जीपीएस सिग्नल, मोबाई सिग्नल, टीव्ही, इंटरनेट अशा विविध सेवा सौरवादळामुळे खंडीत होऊ शकतात. मोठ्या प्रमाणात सौरवादळ असल्यास वीज पुरवठ्यावरही सौरवादळाचा परिणाम होऊ शकतो.    


महत्त्वाच्या इतर बातम्या :