एक्स्प्लोर

दिलासादायक... 21 मेपर्यंत भारतात कोरोनाचं संकट 97 टक्के कमी होईल, SUTD चा अंदाज

जगभरात वाढत चाललेल्या कोरोना व्हायरसमुळे प्रत्येकजण धास्तावला आहे. यात भारतासाठी दिलासा देणारी बातमी आहे. भारतात 21 मेपर्यंत कोरोनाचा प्रभाव कमी होईल, असा अंदाज SUTD ने व्यक्त केला आहे.

मुंबई : जगभरात कोरोनाचा कहर सुरु झाला जानेवारी महिन्यात मात्र याचा शेवट कुठे आणि कधी होणार? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. आतापर्यंत या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नव्हतं. पण हे उत्तर आता मिळालं आहे. सिंगापूरच्या एका विद्यापीठाच्या संशोधनातून या अवघड प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. भारतात 21 पर्यंत कोरोनाचं संकट 97 टक्के कमी होईल, असा अंदाज सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी आणि डिझाईन म्हणजेच SUTD ने केला आहे. मे च्या शेवटी संपूर्ण जागतूनच कोरोना नाहीसा होईल, असाही अंदाज SUTD नं व्यक्त केला आहे. जगभरात वाढत चाललेल्या कोरोना व्हायरसमुळे प्रत्येकजण धास्तावला आहे. प्रत्येक देश या संकटावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. अनेक देशांमध्ये कोरोनामुळं लॉकडाऊन केला आहे. भारतात देखील 3 मेपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. भारतात 21 मेपर्यंत कोरोनाचा प्रभाव कमी होईल. 29 मे पर्यंत जगातील 97 टक्के भागातून कोरोनाचा प्रभाव कमी होईल, असा अंदाज सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी आणि डिझाईननं व्यक्त केला आहे. दिलासादायक... 21 मेपर्यंत भारतात कोरोनाचं संकट 97 टक्के कमी होईल, SUTD चा अंदाज 21 मे पर्यंत भारतातला प्रभाव कमी होईल हे सांगण्यासाठी त्यांनी डेटा सायन्सचा आधार घेतला आहे. SUTD ने हे विश्लेषण संक्रमण पसरण्याच्या वेगाच्या आधारावर केलं आहे. ज्या देशात जास्त रुग्ण आहेत त्या सगळ्या देशांचा अभ्यास या विद्यापीठानं केला आहे. सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी आणि डिझाईननं स्पेन आणि इटलीबद्दल व्यक्त केलेले अंदाज खरे ठरत आहेत. त्यामुळे या अभ्यासाकडे लोक आशेनं पाहात आहेत. भारतात कोरोनाबाधितांची संख्या 27 हजार 892 वर गेली आहे. तर आतापर्यंत 872 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे. तर जगभरात  मागील 24 तासात कोरोनाचे 73859 नवे रुग्ण सापडले आहेत.  वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात 2 लाख 6 हजार 969 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 29 लाख 94 हजार 352 वर पोहोचली आहे. जगभरात 8 लाख 78 हजार रुग्ण बरे झाले आहेत. मागील 24 तासात 73859 नवीन कोरोनाबाधित जगभरात सापडले आहेत. तर मागील 24 तासात जगात 3751 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.  जगभरातील 210 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Chinmay Mandlekar ON CJP Protest: 'वांगचुक यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, श्रीरामांच्या नावाची..' चिन्मय मांडलेकरच्या पोस्टची चर्चा; म्हणाला.. 
'वांगचुक यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, श्रीरामांच्या नावाची..' चिन्मय मांडलेकरच्या पोस्टची चर्चा; म्हणाला.. 
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
CM Devendra Fadnavis in Pandhapur: देवेंद्र फडणवीसांनी मोदीजींसाठी विठुरायाकडे काय साकडं घातलं, ठाकरे बंधूंनाही टोला, पंढरपूर कॉरिडोअर पूर्ण होण्याची डेडलाईनही सांगितली
देवेंद्र फडणवीसांनी मोदीजींसाठी विठुरायाकडे काय साकडं घातलं, ठाकरे बंधूंनाही टोला, पंढरपूर कॉरिडोअर पूर्ण होण्याची डेडलाईनही सांगितली
Ashadhi wari 2026: देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्याच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर
देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्याच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर

व्हिडीओ

Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chinmay Mandlekar ON CJP Protest: 'वांगचुक यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, श्रीरामांच्या नावाची..' चिन्मय मांडलेकरच्या पोस्टची चर्चा; म्हणाला.. 
'वांगचुक यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, श्रीरामांच्या नावाची..' चिन्मय मांडलेकरच्या पोस्टची चर्चा; म्हणाला.. 
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
CM Devendra Fadnavis in Pandhapur: देवेंद्र फडणवीसांनी मोदीजींसाठी विठुरायाकडे काय साकडं घातलं, ठाकरे बंधूंनाही टोला, पंढरपूर कॉरिडोअर पूर्ण होण्याची डेडलाईनही सांगितली
देवेंद्र फडणवीसांनी मोदीजींसाठी विठुरायाकडे काय साकडं घातलं, ठाकरे बंधूंनाही टोला, पंढरपूर कॉरिडोअर पूर्ण होण्याची डेडलाईनही सांगितली
Ashadhi wari 2026: देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्याच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर
देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्याच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
Amruta Fadnavis and Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार का? अमृता फडणवीस यांनी दोन वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार का? अमृता फडणवीस यांनी दोन वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या....
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
Embed widget