Closest Black Hole To Earth : खगोलशास्त्रज्ञांनी जाहीर केले की, त्यांनी पृथ्वीच्या सर्वात जवळचा ब्लॅकहोल (Blackhole) म्हणजेच कृष्णविवर शोधले आहे. हा ब्लॅकहोल आपल्या सूर्यापेक्षा 10 पट मोठा आहे. हा ब्लॅकहोल पृथ्वीपासून 1,560 प्रकाशवर्षे दूर आहे. आतापर्यंतच्या सर्वात जवळ मानल्या जाणार्या ब्लॅकहोलपेक्षा तो पृथ्वीच्या दुप्पट जवळ आहे. या ब्लॅकहोलला Gaia BH1 म्हटले जात आहे, हा ब्लॅकहोल पृथ्वी (Earth) आणि सूर्य (Sun) यांच्यातील अंतराइतकाच दूर आहे, ज्यामुळे तो आणखी खास आहे. तर पृथ्वीचा दुसरा सर्वात जवळचा ब्लॅकहोल सुमारे 3000 प्रकाशवर्षे दूर आहे.
जेमिनी दुर्बिणीने सापडले कृष्णविवर
पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेले ब्लॅकहोल शोधण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे. त्याचा आकार सूर्यापेक्षा 10 पट मोठा असल्याचे म्हटले जाते. पूर्वी सापडलेल्या ब्लॅकहोलपेक्षा ते तिप्पट मोठे आहे. ते पृथ्वीपासून फक्त 1,600 प्रकाशवर्षे दूर आहे. अमेरिकन शास्त्रज्ञांनी सांगितले की, हा ब्लॅकहोल त्याच्या जोडीच्या ताऱ्यांच्या हालचालीचे निरीक्षण करून ओळखला गेला. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. त्याच अंतरावर हा तारा ब्लॅकहोलभोवती फिरतो. हार्वर्ड-स्मिथसोनियन सेंटर फॉर अॅस्ट्रोफिजिक्स आणि मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर अॅस्ट्रॉनॉमीचे प्रमुख लेखक करीम अल-बद्री म्हणाले, 'पहिल्यांदाच आपल्या आकाशगंगेतील तारकीय-वस्तुमानाच्या कृष्णविवरा भोवतालच्या कक्षेत सूर्यासारखा तारा सापडला आहे. ब्लॅकहोलच्या जवळ असलेला हा तारा त्याच्याभोवती फिरत आहे. खगोलशास्त्रज्ञांनी ब्लॅक होलसह आणि त्याची गती पाहण्यासाठी जेमिनी नॉर्थ टेलिस्कोपचा वापर केला, युरोपियन स्पेस एजन्सीच्या गाया स्पेसक्राफ्टमधील डेटाचे विश्लेषण करून टीमने प्रथम ब्लॅक होलची उपस्थिती ओळखली. नंतर जेमिनी नॉर्थवरील मल्टी-ऑब्जेक्ट स्पेक्ट्रोग्राफ उपकरण वापरून ब्लॅक होल ओळखले गेले.
पृथ्वीला धोका नाही
नासाच्या म्हणण्यानुसार, पृथ्वी ब्लॅकहोलमध्ये आकर्षित होणार नाही, याचाच अर्थ पृथ्वीला यापासून कोणताही धोका नाही. कारण कोणताही ब्लॅकहोल सूर्यमालेच्या इतक्या जवळ नाही. सूर्याची जागा ब्लॅकहोलने घेतली, तरी पृथ्वीला धोका नाही. वैज्ञानिकांनी सांगितले, ब्लॅक होलमध्ये सूर्यासारखेच गुरुत्वाकर्षण असेल. पृथ्वी आणि इतर ग्रह ब्लॅकहोलभोवती फिरतील. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, सूर्य कधीही ब्लॅकहोलमध्ये बदलणार नाही.
आकाशगंगेत 100 दशलक्ष ब्लॅकहोल
खगोलशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, आपल्या आकाशगंगेमध्ये सुमारे 100 दशलक्ष ब्लॅकहोल्स आहेत, जे आपल्या सूर्यापेक्षा पाच ते 100 पट विशाल आहेत. अल बद्री म्हणाले, 'जेव्हा आम्हाला पहिल्यांदा या ब्लॅकहोलचे संकेत मिळाले, तेव्हा ब्लॅकहोल आणि तारा सर्वात जवळ येण्यासाठी फक्त एक आठवडा शिल्लक होता. बायनरी सिस्टीमच्या अचूक वस्तुमानाचा अंदाज घेण्यासाठी या टप्प्यावर मोजमाप आवश्यक होते. तर या प्रकल्पाच्या यशासाठी कमी वेळेत निरीक्षणे देण्याची जेमिनी दुर्बिणीची क्षमता महत्त्वाची होती. जर या संशोधनात काहीही चुकले असते तर पुन्हा वर्षभर वाट पाहावी लागली असती. असे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या