Russia Ukraine Tension : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणानंतर रशिया आणि युक्रेनमधील तणावात आणखीच भर पडली आहे. पुतीन यांनी केलेल्या एका घोषणेमुळे दोन्ही देशांमध्ये युद्धाचे ढग गडद झाले आहेत. पुतीन यांनी युक्रेनमधील बंडखोरांच्या ताब्यातील दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर रशिया युक्रेनवर हल्ला करणार असल्याची शक्यता बळावली आहे. 


पुतीन यांनी युक्रेनच्या दोन प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता देण्याच्या विधेयकावर स्वाक्षरी केली. त्यामुळे आता रशियाच्या दृष्टीने लुहांस्क आणि डोनेस्त्क हे दोन स्वतंत्र देश आहे. पुतीन यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात युक्रेनला राष्ट्र म्हणून मान्य नकार दिला. युक्रेन लवकरच अण्वस्त्र निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


पुतीन यांनी म्हटले की, युक्रेनच्या दोन वेगवेगळ्या प्रांतांना मान्यता देणार आहे. रशिया आता स्वघोषित प्रजासत्ताक डोनेत्स्क आणि लुगंस्क यांना देश म्हणून मान्यता देणार आहे. पुतीन यांच्या या घोषणेचे आंतरराष्ट्रीय पातळीवर तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. बंडखोरांच्या पाठिंब्यासाठी रशिया आपले सैन्य युक्रेनमध्ये दाखल करू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. 


युक्रेन अमेरिकेच्या हातचे बाहुलं; पुतीन यांचा आरोप 


युक्रेन हे अमेरिकेच्या हातचे बाहुले बनले आहे, असा आरोप पुतीन यांनी केला. या खऱ्या धोक्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही, असेही ते म्हणाले. विशेषत: आपल्या देशाला आणखी एक धोका निर्माण करण्यासाठी युक्रेनमध्ये शस्त्रास्त्रांच्या उत्पादनास पाश्चिमात्य देश पाठबळ देऊ शकतात असेही पुतीन यांनी म्हटले.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha