Russia-Ukraine conflict : रशिया आणि यूक्रेन यांच्यामध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोन देशांमध्ये तणावाचे वातावरण असतानाच रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी सोमवारी मोठं वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, ‘फ्रान्स(France), जर्मनी (Germany) आणि कियाव (Kyiv)  यांच्या सहमतीसह 2015 च्या महत्वपूर्ण योजना फुटीरतावादी यूक्रेन संघर्ष सोडवण्यास सक्षम होईल असे मला वाटत नाही. ‘ 


रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी आपल्या सुरक्षा परिषदेला सांगितले की,  " 2015 मिन्स्क शांती करार (2015 Minsk peace accords) सध्या सुरु असलेला  (बेलारूसच्या राजधानीत यूक्रेनचे लष्कर आणि देशातील पॉस्को समर्थक) संघर्ष सोडवण्यात यशस्वी होईल असे वाटत नाही, असे वाटतेय." 






रशिया-यूक्रेन तणावात वाढ -  
रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव वाढला असताना पुतीन यांचे हे वक्तव्य आले आहे. पुतीन यांच्या या वक्तव्यामुळे युद्धाची परिस्थिती आणखी वाढली आहे. रविवारी रशियाने यूक्रेनच्या उत्तरी भागाजवळ बेलारूसमध्ये 30 हजार जवान तैणात केले आहेत. तसेच यूक्रेनच्या सीमावर एक लाख 50 हजारांपेक्षा जास्त जवान तैणात करण्यात आले आहेत. लढाऊ विमान आणि अन्य युद्धाचे सामानही रशियाने युक्रेनच्या सीमेवर आणले आहे. फ्रान्स, ब्रिटनसारख्या देशांकडून युद्ध टाळण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी पुतीन यांच्यासोबत बातचीत देखील करण्यात आली, मात्र कोणताही तोडगा निघू शकला नाही. यूक्रेनमधील रशियाच्या समर्थकांच्या ताब्यात असलेल्या भागात स्फोट आणि गोळीबार सुरु आहेत. यात यूक्रेनचे पाच सैनिकांचा मृत्यू झाला आहे.


यूक्रेनच्या राष्ट्रपतींनी पुतिन यांना दिले चर्चेचं आमंत्रण - 
दोन्ही देशातील वाढत्या तणावांमध्ये यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर जेलेंस्की यांनी शनिवारी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना चर्चेचं आमंत्रण दिले आहे. चर्चेतून मार्ग निघेल, असे म्हणत यूक्रेनचे राष्ट्रपती चर्चेसाठी तयार झाले आहेत. रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांना काय हवेय हे मला माहित नाही, पण मी चर्चेसाठी तयार आहे. पुतीन चर्चेला तयार असल्यास लवकरच चर्चा करुन तोडगा निघेल.