Russia Ukraine War : युक्रेनवर रशियाचे हल्ला सातत्याने वाढत आहे, युक्रेनमध्ये (Ukarine) अणुऊर्जा प्रकल्पात (Ukraine nuclear power plant) झालेल्या हल्ल्यात 3 सैनिक ठार झाल्याचे समजत आहे. रशियाने त्यांच्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रशियन बॉम्बफेकीमुळे अणु प्रकल्पाला आग लागली असून स्फोटही झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. 


IAEA प्रमुखांचे दोन्ही देशांना आवाहन
इंटरनॅशनल अॅटोमिक एनर्जी एजन्सी (IAEA) प्रमुख राफेल मारियानो ग्रोसी यांनी युक्रेन आणि रशियासोबत या मुद्द्यावर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, युक्रेनच्या आण्विक स्थळांचे कोणत्याही परिस्थितीत संरक्षण केले पाहिजे, अन्यथा, मोठा विध्वंस होऊ शकतो. युक्रेनमधील अणु प्रकल्पाच्या सुरक्षेशी तडजोड करण्यात आली आहे, आता कारवाई करण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. युक्रेनने आम्हाला याबाबत माहिती दिली आहे. 



हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त
युक्रेनने न्यूक्लियर प्लांटवरील हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनीही या विषयावर बायडेन यांच्याशी चर्चा केली. झेलेन्स्की म्हणाले की रशियाला न्यूक्लियर पॉवर प्लांटवर बॉम्बफेक करून चेरनोबिलची पुनरावृत्ती करायची आहे. याशिवाय युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही याला मोठा धोका असल्याचे म्हटले आणि यावर लवकर नियंत्रण न आणल्यास युक्रेनमध्ये चेरनोबिलपेक्षा 10 पट मोठा स्फोट होऊ शकतो, ज्यामुळे संपूर्ण देश उद्ध्वस्त होईल.


रशियाने युक्रेनच्या झॅपोरीझिया अणुऊर्जा प्रकल्पावर ताबा मिळवला


रशिया आणि युक्रेनमधलं युद्धा आणखीच विद्ध्वंसक होत आहे. रशियाने युक्रेनच्या झॅपोरीझिया अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केल्यानंतर ताबा मिळवला आहे. यानंतर युरोपपासून अमेरिकेपर्यंत खळबळ माजली आहे. ब्रिटनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. रशियन सैन्याने झॅपोरीझिया अणुऊर्जा प्रकल्पावर जोरदार हल्ला केला. यानंतर प्रकल्पातील प्रशिक्षण केंद्राला आग लागली. हल्ल्यात प्लांटच्या युनिट 1 च्या रिअॅक्टर कम्पार्टमेंटचं मोठं नुकसान झालं आहे. सध्या प्रकल्प कार्यान्वित नाही परंतु आत न्यक्लिअर फ्यूअल असल्याची माहिती आहे. त्यामुळे धोका अधिक वाढला आहे. मात्र किरणोत्सर्गाच्या पातळीत कोणत्याही बदलाची नोंद नाही


संबंधित बातम्या


Russia-Ukraine War : युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्याला लागली गोळी, बॉम्बहल्ले अजूनही सुरूच


Ukraine Russia War : रशियाच्या हल्ल्यात युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पात आग