Ukraine Russia War: युक्रेन युद्ध जिंकू शकतो, अशी शक्यता अमेरिकेने वर्तवली आहे. याबाबत बोलताना अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन म्हणाले की, ''रशिया कमकुवत व्हायला हवा, जेणेकरून ते पुन्हा हल्ला करू शकणार नाही. तसेच युक्रेनकडे योग्य उपकरणे असतील तर ते युद्ध जिंकू शकतात, असं ते म्हणाले आहेत. कीव दौऱ्यावरून परतल्यानंतर लॉयड ऑस्टिन असं म्हणाले आहेत.


एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्यासोबत युक्रेनला भेट दिल्यानंतर ऑस्टिन म्हणाले, जिंकण्याची पहिली पायरी म्हणजे तुम्ही जिंकू शकता यावर विश्वास ठेवणे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत म्हणूनच त्यांना विश्वास आहे की ते जिंकू शकतात.


'युद्धात रशियाचे मोठे नुकसान झाले'


ऑस्टिन म्हणाले, "रशियाने आधीच बरीच लष्करी क्षमता गमावली आहे, बरेच सैनिकही. जे आम्हाला दिसत आहे, त्यानुसार आता पुन्हा तशी लष्करी क्षमता पुन्हा उभी करण्यासाठी रशियाला बराच काळ लागू शकतो. युद्धात त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.''


युक्रेनला भेट देणारे पहिले प्रमुख अमेरिकन अधिकारी


24 फेब्रुवारीपासून रशियन आक्रमण सुरू झाल्यापासून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना भेटण्यासाठी ब्लिंकेन आणि ऑस्टिन हे पहिले हाय-प्रोफाइल अमेरिकन होते. ऑस्टिन आणि ब्लिंकेन म्हणाले की अमेरिकन राज्यकर्ते या आठवड्यात हळूहळू युक्रेनला परत येण्यास सुरुवात करतील. त्यांनी युक्रेनला अतिरिक्त लष्करी मदत म्हणून 700 मिलियन डॉलर्सची मदत (653 दशलक्ष युरो) जाहीर केली आहेत. 


महत्वाच्या बातम्या :