Viral News : कॅनडाच्या एका मॉडेलने अतिशय धक्कादायक खुलासा केला आहे. अ‍ॅलिस इरविंग (Alice Irving) नावाच्या या मॉडेलचे म्हणणे आहे की, तिला एका अब्जाधीशाने तिच्याशी जवळीक साधण्यासाठी आणि या प्रसंगाचे रेकॉर्ड करण्यासाठी सहा कोटी रुपयांची ऑफर दिली होती. अब्जाधीशाने दिलेली ही ऑफर 24 वर्षीय अ‍ॅलिस इरविंग या मॉडेलने नाकारल्याचे स्पष्ट केले आहे. 


एकट्याला भेटण्याचा प्रयत्न केला


अ‍ॅलिस इरविंगने सांगितले की, तिला त्या अब्जाधीशाने नॉन-डिक्लोजर करारावर सही करण्यास भाग पाडले. त्यामुळे अशा परिस्थितीत ती त्याचे नाव सांगू शकत नाही. अ‍ॅलिस पुढे म्हणते, "जरी त्याने इतके संकेत दिले की तो एक प्रसिद्ध अब्जाधीश आहे. त्या व्यक्तीने मला एकट्याला भेटण्याचा प्रयत्नही केला होता. त्याने मला सहा कोटी रुपयांची ऑफरही दिली, जी मी साफ नाकारली." ती म्हणते की, 'जर मी बिझनेसमनची इच्छा पूर्ण केली तर माझे करिअर बरबाद होऊ शकते.'


कोणी कितीही ऑफर दिली तरी मी ते काम करणार नाही


अ‍ॅलिसने मीडियाला सांगितले की, ती कधीच कोणाला एकटी भेटत नाही. मॉडेल म्हणून काम करणे ही एक गोष्ट आहे, तर एखाद्याशी जवळीक साधणे आणि व्हिडीओ बनवणे ही दुसरी गोष्ट आहे. या कामासाठी तिला कोणी कितीही पैसे देऊ केले तरी ती ते कधीच मान्य करणार नाही.


दरमहा लाखो रुपये कमावते


अ‍ॅलिस इरविंग सध्या मॉडेलिंगमधून दरमहा लाखो रुपये कमावते. ती म्हणते की, मी सहा वर्षांपासून खूप मेहनत करत आहे. मी वर्षातून 365 दिवस काम करते. मी नेहमी मला आवडणारे काम करते. अ‍ॅलिसची सोशल मीडियावरही चांगली लोकप्रियता आहे. इन्स्टाग्रामवर तिचे साडेचार लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.


महत्वाच्या बातम्या :