Russia Ukraine War : युक्रेन आणि रशियामधील संघर्ष कायम आहे. युद्धाला सुमारे एक महिना पूर्ण होईल. आता युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी नाटोला युक्रेनला सामील करुन घेणार की नाही याबाबतची भूमिका उघडपणे स्पष्ट करण्यास सांगितले आहे. 'द कीव्ह इंडिपेंडंट'च्या वृत्तानुसार, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी युक्रेनचे सार्वजनिक प्रसारक सस्पिलान यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, 'नाटोने आता उघडपणे सांगितले पाहिजे की ते आम्हाला स्वीकारणार आहेत किंवा नाहीत. नाटो रशियाला घाबरत आहे आणि हे खरं आहे.' 


सुमारे दोन आठवड्यांपूर्वी, झेलेन्स्की यांनी म्हणाले होते की, 'आपण आता युक्रेनवर नाटोचे सदस्यत्व मिळवण्यासाठी दबाव टाकत नाहीय.' झेलेन्स्की यांनी असेही म्हटले आहे की, 'नाटो युक्रेनला स्वीकारण्यास तयार नाही. नाटो विवादात्मक गोष्टी आणि रशियासोबतच्या संघर्षाला घाबरत आहे.' युक्रेनने नाटोमध्ये सामील होऊ नये अशी रशियाची भूमिका आहे.


रशियाचा रासायनिक प्रकल्पावर बॉम्बहल्ला - युक्रेन
युक्रेनच्या प्रॉसिक्युटर जनरलने सांगितले की, 'रशियाने सुमी शहराच्या बाहेरील एका रासायनिक प्लांटवरही बॉम्बहल्ला केला. सोमवारी दुपारी 3 वाजता प्लांटवर बॉम्ब टाकण्यात आला, ज्यामुळे टाकीमध्ये ठेवलेला 50 टन अमोनिया गॅस बाहेर पडला. यानेतर गॅस नियंत्रणात आणण्यासाठी अनेक तास लागले.'


दुसरीकडे, रशियन लष्करी प्रवक्ते इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी दावा केला की गॅस सोडणे हे युक्रेनने नियोजित चिथावणीखोर होते. ते म्हणाले की, युक्रेनचे सैन्य रशियावर रासायनिक हल्ले केल्याचा खोटा आरोप करत आहे. कोनाशेन्कोव्ह म्हणाले की, रात्री क्रूझ क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनच्या रिव्हने प्रदेशातील लष्करी प्रशिक्षण केंद्राला लक्ष्य करण्यात आले. यादरम्यान 80 विदेशी आणि युक्रेनियन सैनिक मारले गेल्याचे त्यांनी सांगितले.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha