Indian Embassy : रशियाने युक्रेनमध्ये हल्ले तीव्र केले आहेत. दरम्यान, कीव्हमधील भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना लवकरात लवकर युक्रेन सोडण्यास सांगितले आहे. भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना युक्रेनची सीमा ओलांडणे सुरक्षित पाच पर्यायांची माहिती दिली आहे. भारतीय दुतावासाने याबद्दल ट्विट करत ही माहिती शेअर केली आहे. युक्रेन आणि रशियातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. कीव्हमधील भारतीय दूतावासाने बुधवारी एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. भारतीयांना युद्ध क्षेत्रात जाण्याबाबत चेतावणी देण्यात आली आहे. भारतीय दूतावासाने सांगितलं आहे, जे भारतीय सध्या युक्रेनमध्ये आहेत, त्यांनी शक्य तितक्या लवकर युक्रेनमधून बाहेर पडावं.


परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी कीव्हमधील दूतावासाकडे उपलब्ध माहितीच्या आधारे भारतीय नागरिकांना सीमा ओलांडण्यासाठी उपलब्ध पर्याय शेअर केले. ही माहिती युक्रेन-हंगेरी, युक्रेन-स्लोव्हाकिया सीमा, युक्रेन-मोल्दोव्हा, युक्रेन-पोलंड आणि युक्रेन-रोमानिया सीमा ओलांडून युक्रेन सोडण्याच्या संबंधात होती.






'भारतीयांनी लवकरात लवकर युक्रेन सोडा'


1. भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, युक्रेनची सीमा ओलांडणाऱ्या भारतीय नागरिकांनी देश सोडताना सुरक्षेची मोठी खबरदारी घ्यावी. युक्रेन-हंगेरी सीमेसाठी, चेकपॉईंट्स झाकरपाथिया भागात आहेत. टायसा, झ्विन्कोव्ह, लुझांका, वायलोक, चॉप येथे वाहनांसाठीचे चेकपॉईंट्स आहेत. चोप शहरात रेल्वेने प्रवास करणे हा एक सोयीचा पर्याय आहे.


2. भारतीय नागरिकांकडे वैध पासपोर्ट, वैध युक्रेनियन निवासी परवाना (Posvidka), विद्यार्थी कार्ड/विद्यार्थी प्रमाणपत्र असल्यास सीमा ओलांडण्यासाठी हवाई मार्ग निवडावा.


3. युक्रेन-स्लोव्हाकिया सीमेसाठी, झकारपाथिया प्रदेशात चेकपॉईंट आहेत. उझहोरोड, माली बेरेझनी आणि माली सेल्मेनसीओनली येथे वाहनांसाठी चेकपॉईंट आहे. भारतीय नागरिकांना आधीपासून वैध शेंजेन/स्लोव्हाक व्हिसा नसल्यास सीमा चेकपोस्टवर व्हिसा मिळणं आवश्यक आहे.


4. व्हिसा मिळवण्यासाठी आणि सीमा ओलांडण्यासाठी, भारतीय नागरिकांकडे वैध पासपोर्ट, वैध युक्रेनियन रहिवासी परवाना (Posvidka), विद्यार्थी कार्ड/विद्यार्थी प्रमाणपत्र (असल्यास) आणि शक्यतो हवाई तिकीट असणे आवश्यक आहे.


5. युक्रेन-मोल्दोव्हा सीमेव्यतिरिक्त, चेरनित्स्का (केल्मेंटी, रोशोनी, सोकिरीनी, मामालिहा), विनित्स्का (मोहिलिव्हपोडिल्स्की) आणि ओडेस्का (पालंका-मायाकी, स्टारोकोझाचे) या प्रदेशातही चेकपॉईंट्स आहेत.


वैध मोल्दोव्हन व्हिसा नसल्यास, भारतीय नागरिकांना कीव्हमधील मोल्दोव्हाच्या दूतावासात आगाऊ सूचना देत मोल्दोव्हन ट्रान्झिट व्हिसा मिळवणं आवश्यक आहे.