Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. भारताने सुरक्षेबाबत रविवारी युक्रेन आणि रशियाकडे आपली चिंता व्यक्त केली. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितले की, भारतीय नागरिकांची सुरक्षितेसाठी आणि युक्रेनमधून त्यांना बाहेर काढण्यासाठी भारताने जिनिव्हास्थित इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉसशी (ICRC) संपर्क साधला आहे.


श्रृंगला यांनी सांगितले की, 'परराष्ट्र व्यवहार मंत्रालय युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेला परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या थेट देखरेखीखाली आणि पंतप्रधानांच्या सूचनेनुसार सर्वोच्च प्राधान्य देत आहे.' दरम्यान, बुखारेस्ट (रोमानिया) येथून पाचवे विमान 249 भारतीय नागरिकांसह दिल्लीला रवाना झाले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी ही दिली आहे.







पत्रकारांशी बोलताना श्रृंगला यांनी सांगितले की, भारताने युक्रेनमधून सुमारे 2,000 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे आणि त्यापैकी 1,000 लोकांना हंगेरी आणि रोमानियामार्गे चार्टर्ड विमानांनी भारतात आणले आहे. श्रृंगला म्हणाले की त्यांनी रशिया आणि युक्रेनच्या राजदूतांशी स्वतंत्रपणे चर्चा केली आणि युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत त्यांना माहिती दिली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA